बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन महिले उलटले आहेत. दरम्यान आता आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने शेयर केलेला हा फोटो मिनिटामध्ये व्हायरल झाला आहे.
आलिया भट्टने सोशल मिडियावर एक खास पोस्ट करत येणाऱ्या बाळाबद्दल घोषणा केली आहे. आलिया भट्टने एक गोडो फोटो सोबत घोषणा केली आहे कि त्यांचे बाळ लवकरच येणार आहे. या फोटोमध्ये आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत आहे.
दोघेहि डिस्प्लेमध्ये येत असलेल्या आपल्या बाळाची झलक पाहत आहेत. यादरम्यान आलियाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य देखील पाहायला मिळत आहे. यासोबत एका दुसऱ्या फोटोमध्ये तिने सिंह, सिंहिण आणि त्यांच्या बछड्याचा फोटो शेयर केला आहे.
अभिनेत्रीने हा फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि आमचे बाळ लवकरच येत आहे. आलिया भट्टने हि पोस्ट शेयर केल्यानंतर चाहते आणि सोशल मिडिया युजर्ससोबत तमाम सेलेब्रिटी देखील तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने दोन महिन्यांपूर्वी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते. दोघांच्या ग्रँड वेडिंग आणि त्यांच्या लग्नाचे फोटो खूपच चर्चेमध्ये राहिले होते. अजून देखील त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतात. अशामध्ये लग्नाच्या फक्त दोन महिन्यांमध्येच आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. यामुळे कपलचे चाहते खूपच जास्त एक्साइटेड पाहायला मिळत आहेत.