राजकुमार हिरानी बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. चित्रपटांमधून एखादी कथा सांगण्याची त्यांची पद्धत खूपच वेगळी आहे. म्हणूनच त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट मुन्ना भाई एमबीबीएस सुद्धा राजू हिरानिंच्या अशाच काही चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता. चित्रपटाच्या कथेपासून ते चित्रपटातील व्यक्तिरेखांपर्यंत सर्व काहि प्रेक्षकांना खूप आवडले होते. मग तो मुन्ना भाईचा मित्र सर्किट असो किंवा कॅरम खेळणारे पारसी अंकल असो.

या चित्रपटाचे बजट खूपच कमी होते आणि यासाठी राजकुमार हिरानी कॉस्ट कटिंग म्हणजे कमी खर्च करण्यासाठी काही जुगाडसुद्धा करावे लागले होते. खर्च कमी करण्याचा असाच एक किस्सा आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. मुन्नाभाई एमबीबीएसचा शेवटचा सीन तर आपल्याला चांगलाच माहिती असेल. यामध्ये मुन्ना आणि सुमन उर्फ चिंकीच्या लग्नाचे सीन दाखवला गेला होता. या सीनसाठी हिरानीला एक परफेक्ट लग्नाचे वातावरण हवे होते. परंतु कमी बजटच्या कारणामुळे ते तयार करू शकले नाहीत. म्हणून यासाठी त्यांनी एक जुगाड केला होता.वास्तविक, या चित्रपटाची शुटींग जिथे चालू होती तिथे जवळच एक मंगलकार्यालय होते. तिचे दररोज एक ना एक लग्न होतच असे. आणि हि गोष्ट राजू हिरानींच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या असिस्टंटला त्या मंगलकार्यालयाच्या मालकाशी बोलणी करण्यासाठी पाठवले. मंगलकार्यालयाच्या मालकाने सर्व हकीकत ऐकून घेतली आणि शुटींगसाठी तयार झाला. तो म्हणाला कि रात्री १० वाजता हॉल रिकामा होतो त्यानंतर तुम्ही शुटींग करू शकता.मग तो दिवस आला ज्यावेळी हा सीन शूट करायचा होता. चित्रपटाच्या शुटींगनंतर सर्वजण घरी जायला निघाले होते कि राजू हिरानी यांनी त्या सर्वाना थोडावेळ थांबण्यास सांगितले. संजय दत्त त्याच्या व्हॅनिटीमध्ये बसला होता. दहा वाजले परंतु मंगलकार्यालयाच्या मालकाचा फोन नाही आला. थोड्या वेळाने ज्यावेळी त्याला कॉल केला त्यावेळी तो म्हणाला कि अजून हॉल रिकामा झाला नाही, आणखी काही वेळ लागेल. असे करता करता रात्रीचे ११ वाजले. आणि मंगलकार्यालयाच्या मालकाने त्यांना कॉल करून बोलावून घेतले.
राजू हिरानी यांची टीम जेव्हा तिथे पोहोचली आणि तेव्हा त्यांनी पाहिले कि अजून वधू आणि वर स्टेजवरच बसले आहेत. वधू-वरांना जेव्हा समजले कि त्यांच्या लग्नामध्ये संजय दत्त आला आहे त्यावेळी त्यांनाहि धक्का बसला. ते स्टेजवरुन खाली उतरले आणि संजय दत्त आणि ग्रेसी सिंह पूर्ण गेटअप करून स्टेजवर गेले. राजकुमार हिरानी यांनी लगेच त्यांचा सीन शूट करून घेतला आणि तिथून निघून गेले. अशाप्रकारे मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटाच्या शेवटच्या सीनसाठी शुटींग करण्यात आले तेही एकही रुपया खर्च न करता.आहे ना मजेशीर गोष्ट, विशेष म्हणजे या सीनच्या शुटींगसाठी संजय दत्तला काहीच कल्पना दिली गेली नव्हती कि त्यांना खऱ्या लग्नामध्ये जायचे आहे. त्यामुळे त्या रात्री उशीर झाल्यामुळे संजय दत्तने ड्रिंक घेतले होते आणि नशेमध्ये त्याचे हे शुटींग झाले होते.