२००३ मध्ये सलमान खानचा तेरे नाम चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो खूपच सुपरहिट झाला. या चित्रपटामध्ये सलमान खानने एका प्रेमीची भूमिका साकारली होती. आजसुद्धा सलमान खानची हि भूमिका लोकांना खूप आठवते. या चित्रपटामध्ये भूमिका चावलाने एक साध्या मुलीची भूमिका साकारली होती.

इतकेच नाही तर या चित्रपटामध्ये एक वेडी मुलगी देखील दाखवण्यात आली होती जिची भूमिका राधिका चौधरीने साकारली होती. जी सलमानला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून थांबवण्यासाठी गाडीच्यामागे धावली होती. तो इमोशनल सीन आज सुद्धा लोकांना रडवण्यासाठी पुरेसा आहे. पण वेड्या मुलीची भूमिका साकारणारी राधिका चौधरी आता काय करत आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल.राधिका चौधरीने हिंदी चित्रपटांशिवाय दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. ती खऱ्या आयुष्यामध्ये खूपच सुंदर आहे. राधिकाने आपले करियर १९९९ मध्ये तेलगु चित्रपटामधून सुरु केले होते. ती बॉलीवूडमध्ये ख़ुशी या चित्रपटामधून सर्वात पहिला दिसली होती.
राधिकाने अचानकपणे बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा निरोप घेतला. यानंतर तिने दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपला हात आजमावला. राधिकाला २०१० मध्ये लास वेगास फिल्म फेस्टिवल मध्ये आपल्या शॉर्ट फिल्म ऑरेंज ब्लॉसमसाठी सिल्वर ऐस अवॉर्ड मिळाला होता.