लोक आपल्या लग्नाचे फोटो काढण्यासाठी खूपच उत्सुक असतात. अशावेळी ते उत्स्फूर्तपणे पोज देतात आणि हेच फोटो पुढे चालून त्यांच्या आठवणींचा एक भाग बनतात. पण एक अभिनेत्री अशी आहे जी आपल्या लग्नाचे फोटोच काढायला विसरून गेली आणि यामागचे कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
अभिनेत्रीने सांगितले कि लग्नाच्या पार्टीमध्ये तिचे अर्ध्यापेक्षा जास्त मित्र हे फोटोग्राफर होते तरीही तिच्या लग्नाचा एक देखील फोटो काढला गेला नाही. असे यामुळे झाला कारण अभिनेत्री आणि तिचे मित्र देखील खूपच जास्त नशेमध्ये होते आणि यामुळे लग्नाचे फोटो काढायचे विसरूनच गेले.
बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकतेच आपल्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले कि तिच्याजवळ लग्नाचा एक देखील फोटो नाही. तिने सांगितले कि जेव्हा मी १० वर्षापूर्वी बेनेडिक्टसोबत लग्न केले होते तेव्हा फोटो काढणेच विसरून गेले.
आम्ही लग्नामध्ये मित्रांना बोलावले होते, स्वतः जेवण बनवले, नॉर्थ इंग्लंडमध्ये एका ठिकाणी लग्न केले आणि पार्टी केली, पण कोणताही फोटो घेतला नाही. तथापि आमचे अर्ध्यापेक्षा जास्त मित्र फोटोग्राफर होते, पण त्यामधील एकाने देखील फोटो घेतला नाही.
राधिका पुढे म्हणाली कि आम्ही सर्वजण नशेमध्ये होतो. यामुळे माझ्याजवळ लग्नाचा एकदेखील फोटो नाही. जे एकप्रकारे चांगले देखील आहे. माझे पती फोटो काढण्यामध्ये तेव्हढे उत्कृष्ट नाहीत. ते बिलकुल देखील फोटो काढत नाहीत. पण आता जेव्हा आम्ही व्हेकेशनला जातो तेव्हा आम्ही प्रयत्न करतो कि खूपच कमी फोटो क्लिक व्हावेत.
राधिका आपटे आपल्या पतीसोबत राहत नाही तर ती मुंबईमध्ये राहते आणि तिचा पती बेनेडिक्ट त्याच्या प्रोफेशनमुळे दूर साता समुद्रापार लंडनमध्ये राहतो. आपल्या लाँग डिस्टेंस रिलेशनशिपबद्दल राधिकाने सांगितले होते कि तिचे पर्सनल लाईफ खूपच हेक्टिक राहते कारण तिला लंडन पासून भारतापर्यंत नेहमी प्रवास करावा लागतो.
राधिका आपटेला तिच्या हटके अभिनयामुळे ओळखले जाते. आपल्या १७ वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये राधिकाने अंधाधुंध आणि शोर इन द सिटी सारख्या उत्कृष्ठ चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय ती अनेक वेबसिरीजमध्ये देखीलमध्ये दिसली आहे. राधिका आपल्या प्रोफेशनसोबत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीय.
View this post on Instagram
बोल्ड रोल करण्यास देखील ती मागेपुढे बघत नाही. राधिका नुकतेच रिलीज झालेल्या Zee5 च्या फोरेंसिक वेबसिरीजमध्ये दिसली होती. यामध्ये राधिका एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये होती. राधिका आगामी विक्रम वेधामध्ये देखील दिसणार आहे. ज्यामध्ये ऋतिक रोशन आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram