चित्रपटासाठी काहीपण…’या’ अभिनेत्याने भुमिकेसाठी नुसतं र’क्त घाम गाळले नाही तर आपला ‘ज’बडा’ही मोडला…

By Viraltm Team

Published on:

चित्रपटातील भूमिकेसाठी कलाकार आपले सर्वस्व पणाला लावलेले क्वचितच पाहायला मिळतात. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान त्यापैकीच एक अभिनेता आहे. त्याचप्रमाणे एका अभिनेत्याने भूमिका हुबेहूब दिसावी म्हणून चक्क आपला जबडाच मोडून घेतला आहे.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याने याचा खुलासा केला आहे. अभिनेता आर माधवनचा आगामी रॉकेट्री – द नंबी इफेक्ट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या अभिनेता या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटामुळे आर माधवन सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. यामुळे जगभरामधून या चित्रपटाचे कौतुक करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

चित्रपटामध्ये शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची भूमिका हुबेहूब दिसावी म्हणून आर माधवनने फक्त घामच नाही गाळला तर आपला जबडा देखील मोडून घेतला आहे. यासाठी त्याने अनेक वर्षे मेहनत केली आहे. मुलाखती दरम्यान आर माधवनने याचा खुलासा केला आहे.

त्याला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना माधवन म्हणाला कि, होय मला या भूमिकेमध्ये हुबेहूब दिसायचे होते त्यामुळे मला माझा जबडा मोडावा लागला. त्याला तब्बल दीड वर्षे लागली. आम्ही यासाठी खूप काही केले. वेडेपणाच्या सर्व मर्यादा आम्ही ओलांडल्या आहेत.

रॉकेट्री – द नंबी इफेक्ट हा चित्रपट आर माधवनने स्वतः दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शनासोबत चित्रपटामधील प्रमुख भूमिकांसोबत त्याने अनेक जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या आहेत. चित्रपट १ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a Comment