साउथ स्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी राहिली आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ-स्क्रीन झलक सर्वाना पसंत आहे. सुपरहिट चित्रपट बाहुबली २ मध्ये लोकांनी त्यांना खूपच पसंत केले होते. जिथे जिथे हि जोडी पाहायला मिळाली त्यांना लोकांनी खूपच पसंत केले. एकदा या लोकप्रिय जोडीबद्दल करण जोहरवर प्रभासने अफवा उडवल्याचा आरोप लावला होता.जेव्हा साहो अभिनेता प्रभास करण जोहरचा टॉक शो कॉफी विद करणमध्ये आला होता, तेव्हा त्याने फिल्म निर्माताला आपली सह-कलाकार अनुष्का शेट्टीसोबत डेटिंगची अफवाह उडवल्याचा दोषी ठरवले होते. हे करण जोहरचा लोकप्रिय चॅट शोच्या ६ व्या सीजनदरम्यान झाले होते. प्रभाससोबत राणा दग्गुबाती आणि बाहुबलीचे निर्देशक एसएस राजामौली देखील होते.शो मध्ये करणवर प्रभासने लावला होता आरोप :- शोमध्ये करणने प्रभासला विचारले कि अशी अफवा आहे कि तो आपल्या बाहुबलीमधील सह-कलाकाराला डेट करत आहे. ज्यावर प्रभासने उत्तर दिले, तुम्ही त्या अफवांना सुरु केले. त्याच्या मजेदार उत्तराची सोशल मिडियावर खूप चर्चा झाली होती. बॉलीवूडमध्ये नेपोटिज्मवर खूप चर्चा होऊ लागली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीशी जोडले गेलेले अनेक लोक नेपोटिज्मला सुशांत राजपूतच्या मृत्युला जबाबदार मानत आहेत. तर सुशांतच्या मृत्युबद्दल पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आतापर्यंत खूप लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे करण जोहरने केलेल्या विधानांवर पुन्हा एकदा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.बाहुबलीसंदर्भात रशियन दूतावासाचे ट्विट :- प्रभास नुकताच चर्चेमध्ये आला होता, जेव्हा भारतामधील रशियन दूतावासाने बाहुबली २ बद्दल आपल्या हँडलवर एक क्लिप शेयर केली होती आणि ती पोस्ट चित्रपट रशियाच्या टेलिव्हिजन वाहिनीवर प्रसारित केला जात आहे अशी होती. व्हिडिओसोबत दूतावासाने लिहिले कि, भारतीय सिनेमा रशियामध्ये लोकप्रियता मिळवत आहे. पहा आता रशियन टीव्हीवर हे प्रसारित होत आहे: रशियन आवाजासह बाहुबली.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.