आलिया भट्टच्या भावाबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? बिग बॉस आणि आमीर खानसोबत आहे खास रिलेशन !

By Viraltm Team

Published on:

महेश भट्टच्या मुली आलिया भट्ट आणि पूजा भट्ट नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहत असतात. तथापि त्यांचा मुलगा राहुल भट्टबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. सोशल मिडियावर पूजा भट्टने राहुल भट्टचे काही फोटो शेयर केले होते. २४ जानेवारी रोजी राहुल भट्टचा वाढदिवस होता.

या खास प्रसंगावर पूजाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेयर केले आहेत आणि आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे फोटो सोशल मिडियावर काही क्षणातच व्हायरल झाले. या फोटोसोबत पूजाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आज माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मी एक फॅमिली अल्बम काढला तर त्यामध्ये बघा मला काय मिळाले.या फोटोमध्ये पूजा आणि राहुल एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. दोघेही फोटोमध्ये खूपच क्युट दिसताहेत. पूजा भट्ट हि महेश भट्ट यांच्या पहिली पत्नी किरण भट्टची मुलगी आहे. तर राहुल भट्टसुद्धा किरण भट्टचाच मुलगा आहे. तर आलिया आणि शाहीन भट्ट या सख्या बहिणी आहेत ज्या महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या मुली आहेत.राहुल भट्ट सोशल मिडियापासून नेहमी दूरच असतो. राहुल भट्ट एक फिटनेस ट्रेनर आहे, ज्याने आमिर खानला दंगल चित्रपटासाठी ट्रेनिंग दिली होती. राहुल बिग बॉस सीजन ४ मध्येसुद्धा पाहायला मिळाला होता. तथापि याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.

Leave a Comment