पाकिस्तानच्या रेस्टोरेंटमध्ये आलिया भट्टसोबत झाले ‘घाणे’रडे’ कृत्य, पुरुषांना आकर्षित करण्यासाठी…

By Viraltm Team

Published on:

हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने खूपच कमी काळामध्ये आपली एक खास आणि मोठी ओळख बनवली आहे. फक्त काही वर्षांमध्येच ती बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये जाणून बसली आहे. आलीया भट्टला कोणाच्याहि ओळखीची गरज नाही.

आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव मिळवले आहे. तिच्या चाहत्यांची संख्या असंख्य आहे. आलियाच्या चाहत्यांमध्ये आपला शेजारचा देश पाकिस्तानचे लोक देखील सामील आहेत. पाकिस्तानमध्ये देखील चाहत्यांची संख्या मोठी आहे. नुकतेच पाकिस्तानच्या एका रेस्टोरेंटने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आलियाची मदत घेतली आहे.

पाकिस्तानच्या कराचीमधील एक रेस्टोरेंट आलियाच्या व्हिडीओ क्लिपसोबत आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. यासाठी आलियाच्या नुकतेच येऊन गेलेल्या गंगूबाई काठियावाड़ी चित्रपटामधील एका डायलॉगची मदत घेतली जात आहे.

कराचीमधील एक रेस्टोरेंट यामुळे खूपच चर्चेमध्ये आले आहे. तथापि या रेस्टोरेंटला असे केल्यामुळे खूपच ट्रोल केले जात आहे. रेस्टोरेंटमध्ये चित्रपटाच्या एका सीनला दाखवून पुरुषांना आकर्षित केले जात आहे यासाठी त्यांना २५ टक्के सूट देखील दिली जात आहे.

रेस्टोरेंटने एक पोस्टर देखील बनवून घेतला आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे कि ”आजा ना राजा, किसका इंतजार है. स्विंग आपको 25 प्रतिशत की छूट दे रहा है”. तथापि रेस्टोरेंटला असे करणे खुपच महागात पडले आहे. आलियासोबत केल्या जात असलेल्या अशा हरकतीमुळे सोशल मिडियावरील युजर्स खूपच नाराज झाले आहेत.

रेस्टोरेंटला चांगलेच ट्रोल केले जात आहे. एका व्हिडीओ मध्ये दाखवले जात आहे कि आलिया भट्ट कोठ्यावरील चौकटीवर उभी आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हाताने इशारे करत आहे. हा व्हिडीओ तिच्या गंगूबाई काठियावाड़ी चित्रपटामधील आहे.

एका सोशल मिडिया युजरने कमेंट करताना लिहिले आहे कि, तुमची हि हरकत खूपच घाणेरडी आहे, तुम्हाला यासाठी माफी मागायला हवी. तर एका युजरने लिहिले आहे कि मार्केटिंगसाठी अशा व्हिडीओचा वापर करू नये. आलिया भट्टचा व्हिडीओ आणि तिचे फोटो वापरल्यामुळे होत असलेला वाद पाहून रेस्टोरेंटने नुकतेच याबद्दल विधान केले आहे. हे फक्त मार्केटिंग कॉन्सेप्ट, याला गंभीरतेने घेऊ नये. अजून देखील हा व्हिडीओ रेस्टोरेंट वापरत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment