अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगणची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. न्यासाने अजून बॉलीवूडमध्ये एंट्री केलेली नाही. पण सोशल मिडियावर ती नेहमी सक्रीय असते. न्यासाचे शेयर केलेले फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात.

नुकतेच न्यासाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे. न्यासासोबत असलेला हा मुलगा कोण आहे अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे. न्यासा आणि या व्यक्तीच्या खास फोटोची सध्या तुफान चर्चा होत आहे.

फोटोमध्ये न्यासासोबत दिसत असलेल्या या मुलाचे नाव दानिश गांधी आहे. दानिश गांधी एक फिल्ममेकर आहे. दानिश न्यासाचा भाऊच लागतो. तो अजय देवगणचा भाचा आहे. दानिशने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये तो न्यासासोबत बसलेला पाहायला मिळत आहे.

न्यासा आणि दानिश लंडनच्या हाइड पार्कमधील एका झाडाखाली बसले आहेत. दानिश आणि न्यासाच्या फोटोवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. काही जण तर त्यांना क्युट जोडी देखील म्हणत आहेत. एका युजरने दोघेही क्युट दिसत आहेत असे लिहिले आहे.

न्यासाने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलेले असले तरी ती सोशल मिडिया नेहमी साक्रीय्र असते. न्यासाने शेयर केलेले फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालतात. ती अनेकवेळा तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत मस्ती करताना पाहायला मिळते.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.