आपल्या देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना ओळखत नाही असा कोणताही व्यक्ती नसेल. भारताच्या या सर्वात मोठ्या बिज़नेसमॅनची पत्नी निता अंबानीला सुद्धा आपण चांगलेच ओळखता. निता अंबानी नेहमीची मिडीयाच्या बातम्यांचा हिस्सा बनलेली असते. नितासुद्धा आपल्या पतीसारखी खूप अ‍ॅक्टिव आहे. निता अंबानी रिलायंस फाउंडेशनची चेयरपर्सनसुद्धा आहे. त्याचबरोबर ती आईपीएल टीम मुंबई इंडियंसची मालकीणसुद्धा आहे. यामुळे निता अंबानी सध्या खूपच पॉपुलर झाली आहे.

अरबोंच्या संपत्तीची मालकीण असल्यामुळे निता अंबानीची लाईफस्टाईल सुद्धा खूपच अलिशान आहे. त्यांच्या घरापासून ते त्यांच्या गाड्या आणि पर्सनल जेट पर्यंत त्यांच्या अमिरीमध्ये चार चांद लावतात. निता अंबानीचे वडील रविंद्रभाई दलाल आहेत तर पूर्णिमा दलाल त्यांची आई आहे तर ममता दलाल त्यांची मोठी बहिण आहे. जिथे निता अंबानी अरबोंचा बिजनेस सांभाळते आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते तिथे त्यांची बहिण ममता दलाल खूपच साधे जीवन जगते.इतक्या मोठ्या श्रीमंत घराण्याची मालकीण निता अंबानीची बहिण आज इतके साधारण काम करत आहे कि तुम्हाला विश्वास बासनार नाही. ममता दलाल निता अंबानीच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमध्ये मुलांना शिक्षण देते. अनेक वेळा ममताला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प करताना देखील पाहिले गेले आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि मुकेश अंबानीसोबत लग्न करण्याअगोदर नितासुद्धा एक शिक्षिका होती. लग्नाच्या चार-पाच वर्षेसुद्धा निता एक शिक्षिका म्हणून काम करत होती आणि त्यानंतर तिने बिजनेसमध्ये सुद्धा आपल्या पतीला साथ द्यायला सुरवात केली.फेमस बॉलीवूड कलाकर शाहरुख़ खान, ऋतिक रोशन, ऐश्वर्या राय, आमिर खान इत्यादींचे मुले देखील याच शाळेमध्ये शिक्षण घेतात. एकदा एका मुलाखतीदरम्यान ममताने सांगितले कि, तिने शाहरुखच्या मुलापासून ते सचिनच्या मुलीपर्यंत सर्वांना शिक्षण दिले आहे. परंतु तिने कधी सेलिब्रिटीचा मुलगा आणि एक सामान्य माणसाचा मुलगा यामध्ये कधीच फरक केला नाही.