लग्नाच्या अवघ्या ‘२ महिन्यांमध्येच’ आलियाने दाखवायला सुरु केला आपला ‘रंग’, नीतू कपूर म्हणाली आलियाने माझ्या…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाला २ महिने उलटले आहेत पण अजूनदेखील त्यांच्या लग्नाची चर्चा सुरुच आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले होते ज्यामध्ये भट्ट आणि कपूर कुटुंब सामील झाले होते.

सध्या या दोघांचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता या दरम्यान आलिया भट्टची सासू म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूरने आलिया भट्ट आपल्या कुटुंबाची सून बनल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत याबद्दल खुलासा केला आहे.

जेव्हापासून आलिया आणि रणबीरचे लग्न झाले आहे तेव्हापासून नीतू कपूर नेहमी आपल्या सुनेबद्दल काहीना काही सांगताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिने आलियाचे कौतुक करताना काही शब्द बोलले होते. यादरम्यान तिने पुन्हा एकदा आलियाचे कौतुक केले आहे आणि म्हंटले आहे कि, आज मी सर्वात जास्त खुश आहे. आलियाने रणबीरला खूप सारे प्रेम आणि ख़ुशी दिली आहे.

मी स्वतःला खूप नशीबवान समजते कि आलिया आमच्या कुटुंबाचा भाग बनली आहे. आमचे आयुष्य खरेच बदलून गेले आहे मी खूपच संतुष्ट आहे. ते टेंशन असते ना लग्न झाले नाही, लग्न झाले नाही म्हणून आता लग्न झाले आहे.

रणबीर आलियाबद्दल बोलताना नीतू पुढे म्हणाली कि त्यांनी अनेक लोकांसाठी एक ट्रेंड सेट केला आहे. तुम्हाला मोठे लग्न करण्याचे काहीच गरज नाही. तुम्हाला एक असे लग्न करायला हवे ज्यामध्ये तुम्ही आनंदी राहाल. नाहीतर आपण दुसऱ्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू लागतो.

लग्नाच्या अगोदर आलिया आणि रणबीरने जवळ जवळ ६ वर्षे एकमेकांना डेट केले होते. याआधी रणबीरचे नाव कॅटरीना कैफ आणि दीपिका पादुकोणसोबत जोडले गेले होते. पण यानंतर तो आलिया भट्टच्या प्रेमात पडला आणि दोघांनी ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. आता दोघे आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप खुश आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये रणबीरने आलियासोबतच्या लग्नाबद्दल असे म्हंटले होते कि इतका मोठा बदल झाला नाहीय, आम्ही विचार केला होता कि आम्ही लग्न करणार आहोत ते केले. आम्ही काही कमिटमेंट्स देखील केल्या होत्या. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही कामावर निघून गेलो.

आलियादेखील शुटींगसाठी निघून गेली होती आणि मी देखील मनालीसाठी निघालो होतो. जेव्हा ती लंडनहून परत येईल आणि माझा शमशेरा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा आम्ही एका आठवड्याची सुट्टी घेण्याचा विचार करत आहोत. आम्हाला अजून देखील जाणवत नाहीय कि आम्ही लग्न केले आहे.

आलिया भट्ट लवकरच करण जौहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेमध्ये आहे. याशिवाय आलियाच्या खात्यामध्ये पती रणबीरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपट देखील सामील आहे.

तर रणबीर कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार रश्मिका मंदानासोबत एनिमल चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. दोघांच्या चित्रपटाची शुटींग देखील सुरु झाली आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये चित्रपटाच्या शुटींगचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. याशिवाय रणबीर कपूर लवकरच लव रंजनच्या अंटाइटल चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील त्याच्यासोबत काम करणार आहे.

तर नीतू कपूर लवकरच जुग जुग जियो चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि वरून धवन देखील दिसणार आहेत. हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment