बॉलीवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री नरगिस फाखरी आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिली आहे. नरगिस फाखरीचे नाव अनेक वर्षे उदय चोपडासोबत देखील जोडले गेले. नरगिस फाखरी आणि उदय चोपडा जवळ जवळ ५ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण त्यांनी कधी मिडियासमोर आपल्या रिलेशनचा खुलासा केला नाही.
पण नुकतेच नरगिस फाखरीने प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरसोबतच्या आपल्या रिलेशनवर मौन सोडले आहे आणि तिने रणबीरसोबतच्या आपल्या जवळीकीबद्दल वक्तव्य केले आहे. चला तर जाणून घेऊया रणबीरबदल नरगिस फाखरी काय म्हणाली.
नरगिस फाखरीने आपल्या करियरची सुरुवात रॉकस्टार चित्रपटामधून केली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. दोघांची जोडी दर्शकांना खूपच आवडली होती.
इतकेच नाही तर खऱ्या आयुष्यामध्ये देखील दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट केलं गेले होते. तर नरगिस फाखरी रणबीरची कपूर आई नीतू कपूरसोबत देखील अनेक वेळा पाहायला मिळाली होती. अशामध्ये लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली होती कि नरगिस अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिप आहे.
रॉकस्टार चित्रपटाच्या शुटींगदरम्यान नरगिस फाखरी आणि रणबीर कपूर एकमेकांच्या जवळ आले होते. चित्रपटामधील दोघांच्या केमिस्ट्रीने मोठ्या पडद्यावर चांगला धमाका केला होता. तर खऱ्या आयुष्यामध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. चाहते देखील त्यांची जोडी खूपच पसंद करत होते.
तथापि दोघांनी कधी आपल्या नात्यावर काहीच विधान केले नाही. पण जेव्हा नुकतेच नरगिस फाखरीसोबत या विषयावर चर्चा करण्यात आली तेव्हा ती म्हणाली कि, जेव्हा कोणताही चित्रपट सुरु होतो तेव्हा कलाकारांमध्ये दोस्ती होते. रणबीर आणि मी चांगले मित्र होतो. पण चित्रपट संपल्यानंतर इतरांप्रमाणे आम्ही देखील आयुष्यामध्ये पुढे गेलो. याशिवाय माझ्याजवळ सांगण्यासारखे काहीच नाही.
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर नरगिस फाखरी फिल्मी जगतापासून दूर गेली होती. याचे कारण विचारले असतात ती म्हणाली कि, कुठेना कुठे मला जाणीव झाली होती कि माझ्यावर दबाव वाढत आहे ज्यामुळे मला खूपच स्ट्रेस होत आहे. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबाला मिस करत होते.
मला चांगलेच आठवते कि २०१६ आणि २०१७ मध्ये मला जाणीव झाली होती कि या कामामुळे मला आनंद मिळत नाहीय. मी एका मागून एक चित्रपटांमध्ये काम केले यादरम्यान आणखी बरेच काही होत होते. मला हे थांबवायचे होते. माझ्या मनावर आणि शरीरावर संतुल बनवून ठेवण्यासाठी मला हे थांबवायचे होते म्हणून मी हे पाऊल उचलले.
नरगिस फाखरी हरि हारा वीरा मल्लू या तेलगु चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. त्याअगोदर २०२० मध्ये आलेल्या तोरबाज चित्रपटामध्ये ती पाहायला मिळाली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित करण्यात आला होता.