या आहेत बॉलीवूडमधील ५ सर्वात सुप्रसिद्ध ऑनस्क्रीन आई, नंबर ४ ची तर खूप लोकप्रिय आहे !

By Viraltm Team

Updated on:

आईची भूमिका प्रत्येक लाइफमध्ये महत्वाची असते मग ती खऱ्या आयुष्यातील असो किंवा चित्रपटातील असो. चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायकाची भूमिका जितकी महत्त्वाची असते तितकीच आईची भूमिकाहि महत्वाची असते. आज आपण बॉलीवूडच्या प्रसिद्ध ५ अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मोठ्या पडद्यावर आईच्या भूमिकेला तितकाच न्याय दिला, आईच्या भूमिकेला एक नवी ओळख निर्माण करून दिली.

अचला सचदेव :- दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये काजोलची आजी आणि कभी खुशी कभी गम मध्ये अमिताभच्या आईची भूमिका साकारणारी अचला सचदेव तर तुम्हाला चांगलीच माहिती असेल. याचबरोबर अचला सचदेवला एक आइटम सॉंग ऐ मेरी जोहरा जबी साठी सुद्धा चांगलेच ओळखले जाते. अचलाच्या उत्कृष्ट अभिनयाने आईच्या भूमिकेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.निरूपा रॉय :- निरूपा रॉयने अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटांमधून ती खूपच लोकप्रिय झाली. दिवार चित्रपटामधील निरूपा रॉयच्या उत्कृष्ठ अभिनयाने केवळ निरूपा रॉयलाच लोकप्रियता मिळाली नाही तर या भूमिकेमुळे पुन्हा एकदा आईच्या भूमिकेला अजरामर बनविले.रीमा लागू :- राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री रीमा लागू होती. एक अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये एंट्री करणाऱ्या रीमा लागूला खरी ओळख तिच्या आईच्या भूमिकेमुळे मिळाली. हम आपके है कौन, हम साथ साथ है, जिस देश में गंगा रहता है, मैने प्यार किया या चित्रपटांमध्ये रीमा लागूने उत्कृष्ठ आईची भूमिका साकारली आहे.स्मिता जयकर :- बॉलीवूड मध्ये अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन आलेली स्मिता जयकारला खरी ओळख तिच्या आईच्या भूमिकेमुळेच मिळाली. हम दिल दे चुके सनम आणि शाहरुख खान अभिनीत देवदास हे तिचे काही अविस्मरणीय चित्रपट आहेत. अनेक टीव्ही मालिकांमध्येही तिने आईची भूमिका साकारली आहे आणि टीव्ही जगातही तिने आपला ठसा उमटविला आहे.फरीदा जलाल :- बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून यश मिळविल्यानंतर आईच्या भूमिकेमधूनसुद्धा फरीदा जलालने खूप प्रसिद्धी मिळविली. निरुपा रॉयला जर कोणी आईच्या भूमिकेमध्ये टक्कर देत असेल तर ती अभिनेत्री आहे फरीदा जलाल. दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट फरीदा जलालचा आईच्या भूमिकेमधील सर्वात उत्कृष्ठ आणि अविस्मरणीय चित्रपट आहे. याशिवाय कुछ-कुछ होता है, कभी खुशी कभी गम आणि कुछ तुम कहो कुछ हम कहें या चित्रपटांत देखील तिने आईची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment