बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वर्षी अनेक सुंदर अभिनेत्री चित्रपटांमध्ये डेब्यू करतात. पण त्यापैकी खूपच कमी अशा अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर एक खास ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतात. तर अशा काही अभिनेत्री देखील आहे ज्या लोकप्रिय झाल्यानंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीपासून दूर जातात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी चित्रपटांपासून दूर आहे परंतु आपली एक ओळख मात्र सोडून गेली आहे.
२००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट मोहब्बतें बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट लोकांना खूपच आवडला होता. या चित्रपटाबरोबरच चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनादेखील लोकांनी तितकेच पसंत केले होते. या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांपैकी प्रीति झंगियानीसुद्धा एक होती. जी आता जवळजवळ ३७ वर्षांची झाली आहे.या चित्रपटामधील साधेपण आणि निरागसपणा लोकांना खूपच आवडला होता. या चित्रपटानंतर प्रितीने आवारा पागल दीवाना, चांद के पार चलो, चाहत-एक नशा, सुख, वाह तेरा क्या कहना, अनर्थ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
परंतु तिला या चित्रपटांमधून काही खास सफलता नाही मिळाली. प्रिती आता विवाहित आहे पण खूपच कमी लोकं असतील ज्यांना हे माहिती आहे कि तिचा पती कोण आहे? प्रितीच्या पतीने देखील बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तुम्हाला हे माहिती नसेल कि हाच तिचा पती आहे. चला तर पाहूयात कोण आहे तो अॅक्टर?
प्रीतीने २३ मार्च २००८ रोजी एक मॉडल आणि अॅक्टर प्रवीण डबाससोबत लग्न केले होते. प्रवीण एक अभिनेता तर आहेत त्याचबरोबर फिल्म डायरेक्टरसुद्धा आहे. प्रवीणने मुस्कान, द हीरो, दिल्लगी, माई नेम इस खान, विथ लव तुम्हारा, अपने, इंदु सरकार सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रवीण डबासला जास्तकरून चित्रपटांमध्ये साईड रोलच ऑफर होतो.आज इतक्या वर्षांच्यानंतरही प्रितीची सुंदरता काही कमी झालेली नाही. खरे तर आता ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि स्टाइलिश दिसते. आज प्रीतीने भले हि बॉलीवूडमध्ये काही खास प्रसिद्धी मिळवलेली नाही परंतु चित्रपटामध्ये तिचा साधेपणा आणि सौंदर्याने अनेक लोकांची मने जिंकली होती.प्रवीण आणि प्रितीचा एक लहान मुलगादेखील आणि आणि सध्या प्रिती आपल्या मुलाच्या संगोपनासाठी जास्त वेळ घालवत असते आणि बॉलीवूडसारख्या रंगीबेरंगी जगतापासून दूर राहण्याचे मुख्य कारण तिचा मुलगा जावेद असल्याचे सांगितले जाते.
असे म्हंटले जाते कि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलासाठी वेळ देण्यासाठी तिने बॉलिवूडच्या रंगीबेरंगी जगतातून काढता पाय घेतला. बातमीनुसार प्रिती आता तिच्या पती आणि मुलासोबत मुंबईत राहते. आज प्रिती तिच्या विवाहित जीवनामध्ये खूप आनंदी आहे.