या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत पार्टीमध्ये झाली छेडछाड, तीन जणांच्याविरुद्ध तक्रार दाखल !

By Viraltm Team

Published on:

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मानसीने तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मानसीने आरोप केला आहे कि, एका पार्टीमध्ये तिच्यासोबत छेडछाड केली गेली आहे. मानसी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. हा कार्यक्रम पुण्याच्या युवा सेना प्रमुखाच्या वाढदिवशी आयोजित करण्यात आला होता.

जेव्हा मानसी आपला परफॉर्मेंस देत होती त्यावेळी तिच्यासोबत छेड़छाड़ करण्यात आली. मानसीने हासुद्धा आरोप लावला आहे कि त्या व्यक्तीने मंचावर तिला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. मानसीने मुंबई येथील साकीनाका पुलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली आहे. साकीनाका पोलिसांनी तपासाची सूत्रे रानगांव पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.असे म्हंटले जात आहे कि मानसीने ३ जणांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मानसी टीव्ही इंडस्ट्री सोबतच मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांवर आइटम नंबर देखील केले आहेत. मानसी अनेक टीव्ही सिरीयलमध्ये सुद्धा पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी मानसीने आपल्या रिलेशनशिपबद्दल सोशल मिडिया वर पोस्ट केली होती.तिने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले होते, यावर्षी मी स्वतःला प्रेम आणि प्रतिबद्धतेची भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जरा विचार करा मला काय मिळाले. एक परिश्रमी, समर्पित, निष्ठावान आणि प्रतिबद्ध व्यक्ती. मी प्रेमात आहेत. प्रदीप खरेरा माझ्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment