बॉलीवूड अभिनेत्री आणि सुपरमॉडल मलायका अरोराने रविवारी रात्री झालेल्या फेमिना मिस इंडिया ब्युटी पेजेंटमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यानचा तिचा लुक सोशल मिडियाद्वारे समोर आला आहे ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
मलायकाने स्वतः आपल्या फोटोशूटमधील फोटो सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. समोर आलेल्या या फोटोंमध्ये मलायका दोन्ही हात वर करून खूपच सिजलिंग पोज देताना पाहायला मिळत आहे. मलायकाने यादरम्यान ट्रांसपरंट ड्रेस घातला होता.
ज्यामुळे तिचा लुक आणखीनच सुंदर दिसत होता. मलायका अरोरा नेहमी आपल्या लुकमुळे चर्चेमध्ये राहते. ४८ वर्षाच्या मलायकाचे फोटो पाहण्यासारखे असतात. तिचे चाहते असे म्हणतात कि मलायका जुन्या वाईनप्रमाणे आहे जी काळानुसार आणखीनच चांगली होती जाते.
यादरम्यानच्या मलायकाच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने ट्रांसपरंट गाऊन घातला होता जो खूपच डीपनेक होता. अशामध्ये मलायका आपला क्लीवेज देखील खूपच जास्त दाखवताना दिसत आहे. अशामध्ये ती आणखीनच बोल्ड दिसत होती.
मलायका अरोरा नुकतेचा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरसोबत पॅरिसला गेली होती जिथे ती आपला व्हेकेशन एन्जॉय करून परत आली आहे. अभिनेत्रीने तिथले फोटो देखील आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत ज्यामध्ये ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहायला मिळत आहेत. ज्यानंतर मलायका पहिल्यांदाच एका इवेंटमध्ये सामील झाली होती.
यादरम्यानचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे बॉलीवूड कपल पॅरिसला गेले होते जिथे दोघांनी मिळून अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा केला. अर्जुन कपूरने याचे फोटो देखील सोशल मिडियावर शेयर केले होते.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.