बॉलीवूडची सुंदर आणि टँलेंटेड अ‍ॅक्ट्रेस महिमा चौधरीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. १३ सप्टेंबर रोजी महिमा ४६ वर्षाची झाली आहे. तिचा जन्म १९७३ मध्ये दार्जीलिंग मध्ये झाला होता. तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट परदेसी १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये होता. या चित्रपटातून महिमा चौधरीचे नशीब रातोरात चमकले. तिला या चित्रपटाने मोठी सुपरस्टार बनवले होते. तथापि या चित्रपटानंतर तिचे फिल्मी करियर काही खास नाही राहू शकले.परदेस चित्रपटासाठी सुभाष घईने ३००० पेक्षा जास्त मुलींचे ऑडिशन घेतले होते. यानंतर महिमा चौधरीला सिलेक्ट करण्यात आले. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. सुभाष घईने आपल्या चित्रपटामध्ये माहिमाला संधी दिल्यानंतर तिचे नाव बदलून रितू चौधरी असे ठेवले कारण ते तिला आपल्यासाठी चार्म मानत होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर महिमा चौधरीने टीव्हीच्या जाहिरातीमध्ये काम केले.
महिमा चौधरीने ६ वर्षापर्यंत टेनिसचा प्रसिद्ध खेळाडू लिएंडर पेसला डेट केले होते. परंतु काही काळानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर महिमा चौधरीने लिएंडर पेसवर धोखाधडीचा आरोप लावला. तिने म्हंटले कि तो मुळीच चांगली व्यक्ती नाही. त्याने मला फसवले आहे. लिएंडर पेसने संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबत लग्न केले होते. तर महिमा चौधरीचे २००६ मध्ये आर्टिटेक्ट आणि बिजनेसमॅन बॉबी मुखर्जीसोबत लग्न झाले. २०१३ मध्ये या दोघांमध्ये घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव रियाना आहे.