साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा ! प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, काही दिवसांपूर्वीच आईचे झाले होत निधन…

By Viraltm Team

Published on:

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी प्रसिद्ध तेलगु अभिनेता होते. त्यांना सुपरस्टार कृष्णा नावाने ओळखले जात होते. ७९ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दिग्गज अभिनेता गमावला आहे. हैदराबादच्या एका प्राईव्हेट हॉस्पीटलमध्ये मंगळवारी सकाळी ४ वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला.

सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी कृष्णा घट्टामनेनी यांच्या फिल्म इंडस्ट्रीमधील ५ वर्षाच्या योगदानाला स्मरण केले

महेश बाबूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहते इमोशनल झाले आहेत. सोशल मिडियावर चाहते आणि सेलेब्स टॉलीवुडचे दिग्गज स्टार कृष्णा यांनी भावूक होत श्रद्धांजलि देत आहेत. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये कृष्णा घट्टामनेनीच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

महेश बाबूच्या कुटुंबासाठी हा काळ खूपच कठीण आहे. दोन महिन्यांपूर्वीच महेश बाबूने आपल्या आईला गमवले होते. त्यांच्या धक्क्यामधून सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा त्यांचंवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबू वडिलांच्या निधनामुळे पूर्ण खचला आहे. तो नेहमी सोशल मिडियावर त्यांच्यासोबत आपले फोटो शेयर करायचा. आता आईवडिलांचे हे फोटोच त्यांच्या आठवणी आहेत.

महेश बाबूच्या वडिलांचे तेलगु फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठे योगदान राहिले. त्यांना कृष्णा नावाने ओळखले जात होते. ते अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक तर होतेच त्याचबरोबर ते एक कुशल राजकारणी देखील होते. आपल्या ५ दशकाच्या करियरमध्ये त्यांनी जवळजवळ ३५० चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णा यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरुवात छोट्या भूमिकांपासून केली होती. १९६१ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये डेब्यू केला होता. एक मुख्य अभिनेता म्हणून ते १९६५ मध्ये थेने मनसुलु चित्रपटात दिसले होते.

कृष्णा घट्टामनेनी यांचे दोन लग्न झाले होते. पहिला इंदिरासोबत आणि दुसरे विजय निर्मलासोबत. इंदिरासोबत त्यांना पाच मुले होते. यामधील दोन मुले आणि तील मुली आहेत. मुलांमध्ये रमेश बाबू आणि महेश बाबू आहेत. दोघे भाऊ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. कृष्णा घट्टामनेनीसोबत आता त्यांच्या दोन्ही पत्नी देखील या जगामध्ये नाहीत.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment