महाभारतमध्ये फिरोज खान असे बनले होते अर्जुन, २३ हजार ऑडीशननंतर झाले होते सिलेक्शन !

By Viraltm Team

Published on:

रामायण आणि महाभारत सिरीयलने दूरदर्शनवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिरीयलमध्ये काम करणारे सर्वच कलाकार सध्या चर्चेमध्ये आले आहेत. बीआर चोपडाच्या महाभारतबद्दल बोलायचे झाले तर या सिरीयलमध्ये अर्जुनची भूमिका अभिनेता फिरोज खानने साकारली होती. आजसुद्धा फिरोज खानला अर्जुन म्हणून ओळखले जाते.

महाभारतच्या ऑडीशनमध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी आपले नाव फिरोज खान वरून अर्जुन असे ठेवले होते. महाभारतचे पटकथा आणि संवाद लेखक डॉ राही मासूम रजाने फिरोज खानला सांगितले होते कि २३ हजार लोकांमधून तुझे सिलेक्शन झाले आहे. अशामध्ये अर्जुनच नाव असायला पाहिजे. तू दिसतोसदेखील अर्जुनासारखा आणि इंडस्ट्रीमध्ये देखील या नावाने कोणी नाही आहे. अशाप्रकारे महाभारतमुळे फिरोज खान कायमचा अर्जुन झाला.अर्जुनने महाभारतशिवाय चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. १९८४ मध्ये त्यांनी मंजिल-मंजिल या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. १९८८ मध्ये त्यांना महाभारतमध्ये अर्जुनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. महाभारतचे प्रसारण दूरदर्शनवर ऑक्टोबर १९८८ पसून ते जून १९९० पर्यंत झाले होते.महाभारतमधील भूमिकेसाठी अर्जुन, बीआर चोपड़ाचे नेहमी आभार मानतात. एका मुलाखतीमध्ये अर्जुनने सांगितले होते कि मी आजसुद्धा अर्जुन या नावानेच ओळखलो जातो, ज्याप्रकारे अमिताभ बच्चन जंजीर चित्रपटासाठी, अमजद खान शोले चित्रपटासाठी, धर्मेंद्र फूल और पत्थर चित्रपटासाठी, विनोद खन्ना कच्चे धागे चित्रपटासाठी ओळखले जातात.अर्जुनने पुन्हा एकदा महाभारत सारखी भूमिका साकारण्यासाठी नकार दिला होता कारण त्यांना त्याचप्रकारची भूमिका पुन्हा करायची नव्हती. त्यांनी आपल्या करियरमध्ये २६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये जिगर, तिरंगा, आदमी, फूल और अंगारे, मिस्टर आजाद, करन अर्जुन, मेंहदी, जोड़ी नं १, आणि यमला पगला दीवाना २ सहित बरेच चित्रपट आहेत.

Leave a Comment