भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींचा किसिंग सीन एक सामान्य बाब झाली आहे. कोणतीही अभिनेत्री जराही संकोच न करतात लिप लॉक करण्यास तयार होते कारण यामुळे रातोरात चर्चेमध्ये येता येते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कबीर सिंहमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीने अनेक किसिंग सीन दिले होते ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती.
तर काही अभिनेत्री अशासुद्धा असतात कि ज्या ऑन स्क्रीन किसिंग सीन देण्यास कधीही तयार होत नाही. या अभिनेत्रींमध्ये एक अभिनेत्री आहे कीर्ती सुरेश, जिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे परंतु एकदाहि किसिंग सीन दिलेला नाही.
साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अदाकारा कीर्ती सुरेश फिल्मी दुनियेमधील अशी अभिनेत्री आहे जिने कधीही किसिंग सीन दिलेला नाही. कीर्ती सुरेश फिल्मी जगतातील अन्य अभिनेत्रींच्या तुलनेमध्ये कमी ग्लॅमरस लुकमध्ये दिसत असते. तिला जास्त मॉडर्न ड्रेस घालणे आवडत नाही. ती भारतीय पेहरावाला जास्त पसंती देते.कीर्ती सुरेश मलयालम फिल्म प्रोड्यूसर सुरेश कुमारची आणि ज्येष्ठ अॅक्ट्रेस मेनकाची मुलगी आहे. कीर्तीने तमिल, तेलुगू आणि मलयालम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली अहि. तिने आपल्या फिल्मी करियरची सुरवात बालकलाकार म्हणून केली होती. कीर्तीने पायलट आणि कुबेरन सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे त्याचबरोबर ती काही टेलीव्हिजन शोमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती.२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मलयालम चित्रपट गीताजंलि मध्ये कीर्ती मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर तिने रिंग मास्टर, रेमो, नेनू लोकल, सरकार, नेनू सैजाला सारख्या चित्रपटामध्येसुद्धा काम केले. गेल्या काही काळापासून कीर्तीने सलग उत्कृष्ठ परफॉर्मेंस दिले आहेत ज्यामुळे तिची लोकप्रियता खूपच वाढली आहे. २०१८ मध्ये कीर्तीचे ८ चित्रपट प्रदर्शित झाले होते.महानति या चित्रपटामध्ये कीर्तीने सावित्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सावित्रीचा बायोपिक होता. चित्रपटामध्ये दुलकर सलमान, समांथा आणि विजय देवराकोंडा हे दिग्गज कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. कीर्ती सुरेश लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका माहितीनुसार मैदान या चित्रपटामध्ये ती अजय देवगनसोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सैयद अब्दुल रहीम यांचा बायोपिक आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.