कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो आपण सार्वजण नक्कीच पाहिला असेल. हा शो कॉमेडी शोमधील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती नेहमी आपल्या बोल्ड फोटोंमुळे खूपच चर्चेमध्ये राहत असते. पण सध्या सुमोना चक्रवर्तीचा एक वेगळाच लुक समोर आला आहे. या लुकमध्ये सुमोना ब्राइडल लुकमध्ये पाहायला मिळत आहे. ब्राइडल लुकमधील सुमोनाचा हा फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. सुमोना चक्रवर्ती नववधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि तिचे चाहते देखील तिच्या या फोटोला खूपच पसंत करत आहेत.

या फोटोंमध्ये सुमोना चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये सुमोना चक्रवर्ती लाल लेहंगा परिधान केलेली पाहायला मिळत आहे. ज्यासोबत तिने भारी भरकम ज्वेलरी देखील घातली आहे आणि आणि तिने आपला ब्राइडल मेकअप देखील करून घेतला आहे. सुमोना चक्रवर्तीने स्वतः हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केले आहेत. सध्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत असून या फोटोंना आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.हे फोटो दर्शकांना खूपच जास्त पसंत येत आहेत. लोक सुमोनाच्या फोटोंना भरभरून प्रेम देत आहेत. हे फोटो शेयर करत सुमोनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि – वधू तयार आहे, पण सुमोना अद्याप अविवाहित आहे. तिने अजूनही लग्न केलेले नाही. काही दिवसांपूर्वी तिचे नाव एका व्यावसायिकाशी जोडले गेले होते. पण नंतर या निव्वळ अफवा असल्याचे समोर आले.सुमोना चक्रवर्तीने कपिल शर्माचा शो द कपिल शर्मा शो शिवाय चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. सलमान खानच्या किक चित्रपटामध्ये ती अभिनय करताना पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिची भूमिका अल्पावधीचीच होती परंतु तिने केलेल्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.