लग्नाच्या अगोदरच पिता बनले होते कमल हसन, २२ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत राहिले होते अफेयर !

By Viraltm Team

Published on:

साउथ चित्रपटांमधील सुपरस्टार कमल हासनने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कमल हासनची मुलगी श्रुती हासनचा आज वाढदिवस आहे. कमल हासनने एक बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली होती आणि बघता बघता ते एक मोठे सुपरस्टार बनले. रजनीकांतला हिरो बनवण्याचे श्रेय देखील कमल हासनलाच जाते. रजनीकांत जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करत होते तेव्हा कमल हासनच्य अपोजिट त्यांना दुसरी मुख्य भूमिका मिळाली होती यामुळे रजनीकांतला बर्‍याच चित्रपटांमध्ये सेकंड लीड रोल मिळू लागला.

परंतु रजनीकांतला मुख्य भूमिका साकारायची होती. यासाठी कमल हासनने त्यांचासोबत काम करने बंद केले, जेणेकरून रजनीकांतला मुख्य भूमिका मिळू शकेल. कमल हासन आपल्या अफेयरमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिले. १९७० मध्ये कमल हासन प्रसिद्ध अभिनेत्री श्रीविद्याच्या प्रेमात पडले. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते परंतु नंतर ते वेगळे झाले.जेव्हा श्रीविद्याने २००६ मध्ये शेवटचा श्वास घेतला होता त्यावेळी कमल हासन तिला बघण्यासाठी गेले होते. यादरम्यान कमल हासन स्वतःपेक्षा वयाने मोठी असलेली डांसर वाणी गणपतिच्या प्रेमात पडले होते. दोघांनी लग्नदेखील केले. परंतु १० वर्षानंतर कमल हासनच्या आयुष्यामध्ये सारिका आली. सारिकाच्या प्रेमात पडल्यानंतर कमल हासनने वाणीला घटस्फोट दिला.सारिका आणि कमल हासन एकत्र राहू लागले. दोघे लिव-इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिले. १९८८ मध्ये सारिका आणि कमल हासनने लग्न केले परंतु तोपर्यंत सारिकाने श्रुति हासनला जन्म दिला होता. १९९१ मध्ये कमल हासन आणि सारिकाला आणखी एक मुलगी झाली जिचे नाव होते अक्षरा हासन. तथापि पुन्हा कमल हासन आणि सारिकाचे नाते तुटले. यानंतर कमल हासनने स्वतःपेक्षा २२ वर्षाने लहान असलेली अभिनेत्री सिमरन बग्गासोबत लग्न केले. २००५ पासून २०१६ पर्यंत कमल हासन गौतमीसोबत लिव-इन मध्ये राहिले होते त्यानंतर ते वेगळे झाले.

Leave a Comment