बॉलीवूडची सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय काजल सध्या आपल्या नुकतेच प्रदर्शित झालेल्या तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. त्याचबरोर या चित्रपटामध्ये पती अजय देवगनसोबत ती पाहायला मिळाली आहे. काजोलने खूप काळानंतर चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर काजोलने तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटामध्ये तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची मराठी भूमिका साकारली आहे. तिच्या या लुकला दर्शकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.काजोलने नुकताच तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटातील आपल्या लुकचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये मराठी लुकमध्ये काजोल खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो तिच्या चित्रपटातील भूमिकेचा फर्स्‍ट लुक टेस्‍ट फोटो आहे. या मोनोक्रोम फोटोमध्ये ती कैंडिड मूडमध्ये दिसत आहे. काजोलच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सध्या हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो शेयर करताना काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, तान्हाजीचा पहिला लुक टेस्ट, आपले आई-वडील स्वातंत्र्याविषयी जो विचार करत होते, त्याच्यामधील अंतर हा आहे कि त्यांनी यासाठी खूप संघर्ष केला आहे. ते याला दुसऱ्या कोणासाठीहि नाही सोडू शकत कि काय अंतर आहे.
याशिवाय काजोलच्या या फोटोला आतापर्यंत सोशल मिडियावर लाखो हिट्स मिळाले आहेत. काजोलच्या फर्स्ट लूक टेस्टच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांव्यतिरिक्त तिची छोटी बहिण तनिशा मुखर्जीनेही कमेंट केली आहे. तनिशाने कमेंट करताना काजोलची तुलना आई तनुजासोबत केली आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटामध्ये अजय देवगन छत्रपति शिवाजी महाराजांचे सेनापती सुबेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये काजोल-अजय व्यतिरिक्त सैफ अली खान, पंकज त्रिपाठी आणि शरद केळकर मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही शानदार प्रदर्शन करत आहे.