जान्हवी कपूर तिची आई श्रीदेवीच्या खूप जवळ होती. जेव्हा जान्हवी धडक चित्रपटाची शुटींग करत होती त्यावेळी श्रीदेवीचे दुबईमध्ये निधन झाले होते. जान्हवीने अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख केला आहे कि श्रीदेवीला तिचा डेब्यू चित्रपट पहायचा होता. पण असे होऊ शकले नाही. धडक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच श्रीदेवीचे निधन झाले. आज जान्हवी कपूरचा वाढदिवस आहे.

जान्हवीने श्रीदेवीच्या निधनानंतर एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता कि श्रीदेवीने धडकचे २५ मिनिटाचे फुटेज पाहिले होते. हे पाहिल्यानंतर तिने आपल्या मुलीला काही टिप्ससुद्धा दिल्या होत्या. जान्हवीने सांगितले कि मला फुटेजमध्ये पहिल्यांदा पाहिल्यानंतर तिने सांगितले होते कि तुझा मसकारा खूपच पसरला आहे, जो तुला डिस्टर्ब करत आहे. तू कधीही चेहऱ्यावर येणाऱ्या गोष्टी रोखू शकत नाही. यासाठी आधीच तयार रहा.जान्हवीने सांगितले कि मी लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे पण तिथे पहिल्यांदा सोडताना आई म्हणाली होती कि कमळाला चिखलामध्ये सोडत आहे. आईची इच्छा नव्हती कि मी फिल्मी दुनियेमध्ये प्रवेश करावा. पण ती ख़ुशीच्या प्रवेशासाठी निश्चित होती. तिला नेहमी वाटत होते कि मी खूप सेंसिटिव आहे.जान्हवीने हेसुद्धा सांगितले कि दुबईला जाण्यापूर्वी पहिल्यांदा मी आईसोबत वेळ नाही घालवू शकले. पूर्ण दिवस शुटींगनंतर रात्री उशिरा माझी तिच्यासोबत भेट झाली. मी आईला म्हणाले कि तू मला झोपी घाल. पण ती तयारीमध्ये व्यस्त होती. यामुळे मी माझ्या रुममध्ये जाऊन झोपले. पण मी झोपेत होते आणि ती माझ्या रूममध्ये आली. मला झोपेमध्ये सुद्धा तिचे हात माझ्या कपाळावर जाणवत होते. आईची कमी कोणीही पूर्ण करू शकत नाही.