लहानपणी गर्लफ़्रेंडला असे उल्लू बनवले होते जॅकी श्रॉफने, आईनेसुद्धा दिली होती साथ !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ जग्गु दादा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या उदारपणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी निगडीत असा एक किस्सा सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल कि ते लहानपणी किती खोडकर होते.

हि गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी जॅकी श्रॉफ शाळेत शिकत होते. आपल्या शाळेतील दिवसांच्या आठवणी सांगताना जग्गू दादा म्हणाले कि, ते जेव्हा शाळामध्ये शिकत होते त्यावेळी ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. ती मुलगी एका श्रीमंत कुटुंबातील होती तर जॅकी एका साधारण चाळीमध्ये राहत होता.एकदा त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांना सांगितले कि, मला तुझ्या आईला भेटायचे आहे त्यावेळी जॅकी तिला घेऊन त्याच्या घरी गेला. तेव्हा जॅकीने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत प्रँक केले होते. जॅकी तिला म्हणाला कि, तो आपल्या आईसोबत नाही राहत, परंतु तो पीजीमध्ये राहतो. या प्रँकमध्ये त्याने आपल्या आईदेखील सामील केले होते.

जॅकी आणि त्याची गर्लफ्रेंड जॅकीच्या घरी पोहोचायच्या अगोदर त्याची आई घराबाहेर निघून गेली होती. जोपर्यंत जॅकीची गर्लफ्रेंड घरामध्ये होती ती घरी आलीच नाही. या गोष्टीचा खुलासा स्वतः जॅकी श्रॉफने द कपिल शर्मा शोमध्ये केला होता. आणि हा किस्सा आठवून ते खूप हसत होते.

पण नंतर जेव्हा जॅकी श्रॉफला हे समजले कि प्रेमामध्ये अमीरी-ग़रीबी असा भेदभाव नसतो त्यावेळी त्यांनी स्वतः जाऊन आपल्या गर्लफ्रेंडला सर्व काही खरे सागितले होते. त्याने सांगितले कि, ते एका छोट्या चाळीमध्ये एका छोट्या खोलीत आपल्या कुटुंबांसमवेत राहतात.जॅकीच्या दरियादिलीची आठवण काढताना शोची जज अर्चना पूरन सिंहनेसुद्धा त्यांचे एक गुपित शेयर केले. ती म्हणाली कि, स्ट्रग्लिंगच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्याजवळ पैसे नव्हते आणि रस्त्यामध्ये जेव्हा त्यांना भिकारी दिसत होता त्यावेळी जॅकी अर्चनाकडून पैसे घेऊन त्याला देत असे. असे म्हंटले जाते कि, आजही जॅकी श्रॉफ तीन बत्ती चाळीतील लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहेत. त्यांच्या एका कॉलवर आजदेखील त्यांच्या मदतीला धावून जातात.

Leave a Comment