हिंदी चित्रपटांमधील अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान चर्चेमध्ये राहण्याची कोणतीच संधी सोडत नाही. इरा खानने अजूनपर्यंत बॉलीवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. अनेकवेळा तिच्या बॉलीवूड डेब्यूच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण ती बॉलीवूडपासून दूर आहे आणि नेहमी चर्चेमध्ये बनून राहते.
२५ वर्षाची इरा आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेमध्ये बनून राहते. तिचे पर्सनल आयुष्य कोणापासून लपून राहिलेले नाही. ती अनेक दिवसांपासून नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघांचे रिलेशन जगजाहीर झाले आहे. २०२१ मध्ये व्हेलेंटाईन डेच्या दरम्यान इराने सोशल मिडियावर रोमांटिक फोटो शेयर करून आपले रिलेशन जगजाहिर केले होते.
नुपूर आणि इरा नेहमी एकमेकांसोबत पाहायला मिळत असतात. आमीरची मुलगी नुपूरवर अतोनात प्रेम करते. असे वाटते कि ती नुपूरशिवाय राहूच शकत नाही. ती नुपूरच्या प्रेमात पागल झाली आहे. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि सोशल मिडियावर नेहमी त्यांच्या प्रेमाची झलक पाहायला मिळते.
इराचा बॉयफ्रेंड नुपूरचे इराचे वडील आमीर खानसोबत देखील चांगले रिलेशन आहे. दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग आहे. अनेक प्रसंगी आमीर आणि नुपूर एकत्र पाहायला मिळत असतात. कोणताही सण असो नुपूर आणि इरा मिळून साजरा करतात आणि यादरम्यान आमीर खान देखील त्यांच्यासोबत पाहायला मिळतो.
नुपूर आणि इरा एकमेकांसोबत खास वेळ घालवताना पाहायला मिळतात. दोघांचा बराच वेळ एकेमेकांसोबतच जातो. रात्र असो किंवा दिवस दोघे एकत्रच पाहायला मिळतात. सोशल मिडियावर देखील दोघे आपले रोमांटिक फोटो शेयर करत असतात.
मेमध्ये इराचा २५ वा वाढदिवस साजरा झाला होता. या निमित्ताने तिने पूल पार्टीचे आयोजन केले होते. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नुपूर शिखरे देखील सामील झाला होता. दोघांनी मिळून पूलमध्ये चांगलेच एन्जॉय केले होते. या दरम्यान आमीर खान आणि इराची आई रीना दत्तादेखील पाहायला मिळाली होती.
सर्वांनी मिळून इराचा वाढदिवस साजरा केला होता. सुरुवातील नुपूर हा इराचा फिटनेस ट्रेनर होता. आपल्या वडिलांच्या फिटनेस ट्रेनरवरच इरा फिदा झाली होती. आता दोघांचे चाहते त्यांना विवाहबंधनामध्ये अडकताना पाहू इच्छितात.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram