अशी सुरु झाली होती रेखा आणि मुकेश अग्रवालची लव्ह स्टोरी, नात्याचा झाला होता दु:खद अंत !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाला तर आपण ओळखतच असाल. तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती एक सुंदर अभिनेत्री तर आहेत पण एक चांगली व्यक्ती देखील आहे. आपल्या करियरमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. १० ऑक्टोबरला ती आपला वाढदिवस साजरा करत असते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि ती आपल्या अभिनयामुळे कमी आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे रेखा जास्त चर्चेमध्ये राहिली.

तिच्या अफेयर्सच्या चर्चा आज देखील नेहमी होत असतात. रेखा आणि अभिताभ दरम्यान अफेयरबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि रेखा आणि मुकेश यांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली. दोघांचे लग्न देखील झाले होते. अशी सुरु झाली होती रेखा आणि मुकेश अग्रवालची लव्ह स्टोरी.
अभिनेत्री रेखा आणि बीमा रमानी जी एक खूपच चांगली फॅशन डिझायनर आहे या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. जेव्हा रेखा तिला भेटली होती तेव्हा ती नेहमी तिला विचारायची कि तिला कुठे सेटल व्हायचे आहे. ती एका अशा व्यक्तीच्या शोधात होती जो तिच्यावर खूप प्रेम करेल. रेखा आणि मुकेशची भेट बीना रमानीने घडवून आणली होती. बीनाने रेखाला मुकेश अग्रवालचा नंबर दिला होता. पण रेखाने आपला नंबर देण्यास मनाई केली होती. त्यावेळी लँडलाइन फोन असायचे. रेखाला मुकेशसोबत बोलायचे नव्हते. तेव्हा बीनाने रेखाला समजावले कि तिला आपल्या आयुष्यात पुढे जायला हवे.

मुकेश अग्रवालच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाने रेखा प्रभावित झाली :- काही काळानंतर रेखा आणि मुकेश अग्रवालचा थोडा थोडा संवाद सुरु झाला. हळू हळू दोघांमधील संभाषण वाढत गेले. दोघांची पहिली भेट मुंबईमध्ये झाली होती. त्यावेळी अभिनेत्री रेखा मुकेशच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाने प्रभावित झाली होती, पण मुकेश अग्रवाल आधीपासूनच रेखाच्या प्रेमात पडले होते. जेव्हाकधी रेखा आणि मुकेश अग्रवालची भेट होत होती तेव्हा मुकेश अग्रवाल रेखाचे खूप कौतुक करत असत.दोघांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला :- अभिनेत्री रेखा आणि मुकेश अग्रवाल जवळ जवळ एक महिना एकमेकांसोबत बोलत होते आणि भेटत होते. एक दिवस जेव्हा मुकेश अग्रवाल रेखाला भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी रेखाला प्रपोज केले, ज्याला रेखाने होकार दिला. अचानक मुकेश म्हणाले कि आपण लग्न करूयात. १९९० मध्ये जुहू स्थित एका मंदिरामध्ये दोघांनी लग्न केले.

अशाप्रकारे झाला झाला होता रेखा आणि मुकेशच्या नात्याचा अंत :- मुकेश अग्रवाल व्यावसायिक होते. लग्नाच्या काही महिन्यानंतर मुकेशला व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला. ज्यामुळे ते नेहमी अस्वस्थ राहायचे, तर रेखा खूप चिंतीत राहायची. रेखा दिल्लीहून मुंबईला मुकेशला भेटण्यासाठी येत असायची, जे मुकेशला आवडत नव्हते. मुकेशची इच्छा होती कि रेखाने चित्रपटामध्ये काम करू नये.बातमीनुसार असे देखील म्हंटले जाते कि मुकेश अग्रवाल सतत डि प्रे श न चे शिकार होत होते, ज्यामुळे त्यांनी औषधे देखील घ्यायला सुरुवात केली होती. हळू हळू रेखा आणि मुकेश यांच्यामधील बातचीत बंद झाली. लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यानंतरच रेखाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मुकेश आधीपासूनच व्यवसायामध्ये झालेल्या तोट्यामध्ये चिंतीत होते त्यात आणखी वैवाहिक आयुष्यामुळे आणखी डि प्रे श नमध्ये गेले. १९९० च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी फा शी घेऊन आ त्म ह त्या केली होती.

Leave a Comment