असे म्हंटले जाते कि मुलांमध्ये देव असतात. यामुळे मुले इतकी दयाळू आणि निरागस असतात. मुलांमध्ये इतकी ममता आणि माणुसकी असते कि ते आपल्या परीने सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. असेच काही एका ५ वर्षाच्या मुलीसोबत देखील झाले. हि मुलगी दररोज संध्याकाळी जेवणानंतर घरामधून गायब होत होती.
ज्याबद्दल तिच्या आईवडिलांना काहीच माहिती नव्हते. जवळ जवळ तीन-चार दिवस जेव्हा मुलीच्या वडिलांना ती रुममध्ये दिसली नाही तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचा पाठलाग करण्याचा विचार केला. मुलगी दररोज संध्याकाळी १ तासासाठी घरामधून गायब होत होती. जेव्हा तिचे वडील टॉमने जेव्हा तिचा पाठलाग केला तेव्हा त्यांना असे सत्य समजले जे जाणून त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. टॉम यानंतर पोलिसांना इन्फॉर्म केले आणि मिडिया चॅनल वर बोलताना म्हंटले कि त्यांची लहान मुलगी एमा सर्वांपासून लपून हे काम कसे काय करत होती.
मुलीला एकट्यानेच येण्याची मिळाली होती नोट :- जेव्हा टॉम आणि त्याची पत्नी दोघांनी नोटीस केले कि त्यांची मुलगी दररोज काही वेळ गायब होत होती तेव्हा त्यांनी याबाबत एमाला विचारपूस केली. तथापि मुलीने याबद्दल त्यांना काहीच सांगितले नाही. सतत पाचव्या दिवशी जेव्हा एमा आपल्या घरामधून गेली तेव्हा टॉमने तिच्या रूममध्ये शोधा शोध केली. टॉमला एमाच्या उशाला चीटकवलेला पांढरा कागदामध्ये लिहिलेली नोट सापडली.
नोटवर लिहिले होते कि संध्याकाळी ठीक ६.३० वाजता आपल्या मैदानाच्या पाठीमागच्या घरामागे जा आणि हे सुनिश्चित कर कि तू एकटीच आहेस. हे वाचून टॉम हैराण झाला. त्याला काहीच समजले नाही कि त्याच्या मुलीला असे एकटे कोण बोलवत आहे. यामुळे टॉमने मुलीचा पाठलाग करण्याचा विचार केला.
घराच्या मागे जंगलामध्ये झाली गायब :- सहाव्या दिवशी ६.०० वाजता आपल्या मुलीवर त्याने नजर ठेवायला सुरुवात केली. त्याने पाहिले कि एमा घरातून बाहेर पडली आणि जंगलामध्ये गायब झाली. तथापि नोटमध्ये ज्या घराबद्दल सांगितले होते त्या घराबद्दल टॉमला माहिती होते. यामुळे एमाला शोधण्यासाठी त्याला कठीण गेले नाही. ते घर टॉमच्या आजी आजोबांचे होते जिथे जवळ जवळ ५० वर्षांपासून कोणी राहत नव्हते. तिथे पोहोचल्यानंतर टॉमने पाहिले कि बाल्कनीमध्ये कोणतर एमाची वाट पाहत होते.
एमा तिथे पोहोचताच तिला आतमध्ये घेऊन दरवाजा बंद केला गेला. टॉमने घराच्या मागच्या दरवाजामधून आत जातो. तिथे त्याला एका महिलेचा आवाज ऐकू येतो. टॉम पाहतो कि एमा थोड्या वेळाने तेथून निघून जाते. एमा गेल्यानंतर टॉम त्या रूममध्ये जातो जिथे ती महिला होती. तेथीला नजरा पाहून टॉम हैराण होतो.
रूममध्ये २० पेक्षा जात कुत्रे होते :- टॉम जेव्हा रुमच्या आतमध्ये पाहतो तेव्हा त्याला दिसते कि रूममध्ये २० पेक्षा जास्त कुत्रे होते आणि त्यांच्यासोबत एक वृद्ध महिला बसली होती. पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर वृद्ध महिलेने रडत रडत टॉमला सर्वकाही सांगितले. महिलेने सांगितले कि ती एमाच्या शाळेजवळ वृद्धाश्रममध्ये राहत होती.
पण ती तिथे राहू शकत नव्हती यामुळे तिने तेथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिला सर्वांपासून लपून राहायचे होते नाहीतर वृद्धाश्रमवाले तिला पुन्हा पकडून घेऊन गेले असते. १ वर्षापासून ती गल्लीमध्ये भटक्या कुत्रांसोबत राहत होती. नंतर तिला एमा भेटली. वृद्ध महिलेने टॉमला सांगितले कि त्याची छोटी मुलगी एमानेच महिलेला या घराबद्दल सांगितले आणि इथे राहण्याची परमिशन दिली.
आपल्या वाट्याचेही खाऊ घालत होती :- वृद्ध महिलेने टॉमला सांगितले कि त्यांना काही दिवसांपासून अन्नाची कमतरता भासत होती. एमा आपल्या वाट्याचे जेवण वाचवून दररोज संध्याकाळी इथे घेऊन येत होती. पण याने देखील तिचे आणि कुत्र्याचे पोट भरत नव्हते. हे सर्व ऐकून टॉमच्या डोळ्यामध्ये पाणी आले त्याने घरी जाऊन आपल्या मुलीला मिठी मारली.
यानंतर टॉम आणि त्याची पत्नी दोघांनी वृद्ध महिला आणि सर्व कुत्र्यांची मदत करण्याचा विचार केला. त्यांनी वृद्ध महिलेला आपले घर राहण्यासाठी दिले. त्याचबरोबर दररोज तिचे आणि कुत्र्यांच्या जेवणाची सोय केली. टॉमचे कुटुंब ४० कुत्र्यांची काळजी घेत आहे. तर १५ कुत्र्यांना लोकांनी दत्तक घेतले आहे. हे सर्व ती लहान मुलगी एमामुळे शक्य झाले.