करिश्मा कपूरला सोडून जया बच्चन यांनी या कारणासाठी केली ऐश्वर्या रायला त्यांच्या घरची सून, कारण जाणून दंग व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

बॉलिवूडच्या दुनियेत एकाहून एक सुंदर जोडपी आहेत. यातीलच एक सुंदर जोडी होती ती म्हणजे अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूरची. एक काळ असा होता ज्यावेळी अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्याकाळी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा खूप व्हायच्या. शिवाय या दोघांनी एकमेकांसोबत साखरपुडा सुद्धा केला होता. मात्र अचानक काही कारणास्तव या दोघांचे नाते तुटले आणि त्या दोघांनी कायमसाठी आपापले वेगळे मार्ग अवलंबले.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री करिष्मा कपूर पाच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांचे नाते तुटेल असे कोणालाच वाटले नव्हते. आता या प्रकरणाला अनेक वर्षे उलटून गेली असली तरीही या दोघांचे चाहते जाणू इच्छितात ही साखरपुड्यानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला. आम्ही आज तुम्हाला या पोस्ट मार्फत त्यांचे सत्य सांगणार आहोत.

खरेतर अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांची ओळख अभिषेक बच्चन ची मोठी बहीण श्वेता बच्चन च्या लग्नामध्ये झाली होती. करिश्मा कपूरच्या आत्याच्या मुलाशी म्हणजेच निखिल नंदा सोबत श्वेताचे लग्न झाले. याच लग्नात करिष्मा व अभिषेक पहिल्यांदा भेटले व एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी ते दोघे त्यांच्या नात्याला लग्नाच्या बंधनात बांधू इच्छित होते. जेव्हा त्या दोघांचे नाते जगासमोर आले त्यावेळी कोणालाच त्यांच्या नात्याबाबत कोणताच त्रास नव्हता मात्र करिष्मा ची आई बबिता व अभिषेक ची आई जया बच्चन या दोघी सुरुवातीपासूनच त्या नात्यापासून नाखूष होत्या.

मात्र तरीही अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या दिवशी करिष्मा व अभिषेक च्या साखरपुड्याची अनाउन्समेंट केली गेली व लवकरच बॉलिवूडमधील दोन दिग्गज परिवार नात्यात बांधले जाणार असल्याचे सांगितले. बिग बींच्या वाढदिवसादिवशी स्वतः जया बच्चन यांनी अनाउन्समेंट करून सांगितले की बच्चन परिवार व नंदा परिवारासोबत अजून एक परिवार बांधले जाणार आहे ते म्हणजे कपूर परिवार. माझ्या होणाऱ्या सुनेचे नाव करिष्मा कपूर आहे. पुढे जया बच्चन ने हे देखील सांगितले की अभिषेक कडून त्याच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त चे हे गिफ्ट आहे. असे म्हटले जाते की त्यावेळी बच्चन परिवार आर्थिक संकटातून जात होते कारण अमिताभ बच्चन यांच्या कंपनीला सतत तोटा होत होता तर अभिषेक बच्चनचे करिअर सुद्धा फारसे नीट चालत नव्हते.

मात्र करिष्मा कपूर चे करिअर त्याकाळी एकदम वेगळ्याच उंचीवर होते. त्यामुळे स्वतःच्या मुलीच्या आयुष्यात कोणत्याच अडचणी येऊ नये असे बबिता ला वाटत होते. बच्चन परिवाराचे त्या वेळची स्थिती लक्षात घेता बबिता यांनी अभिषेक व करिष्मा च्या लग्नापूर्वी एक कॉन्ट्रॅक्ट बनवण्याची मागणी अमिताभ बच्चन कडे केली. मात्र बच्चन परिवाराने तसे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट बनवण्यास नकार दिला.

असे म्हटले जाते की बबिता ने बच्चन परिवारा समोर दोन अटी ठेवल्या होत्या त्या म्हणजे लग्नानंतर अभिषेक व करिष्मा बच्चन परिवारासोबत राहणार नाही. आणि दुसरे म्हणजे रणधीर कपूर करिश्माचे कन्यादान करणार नाहीत कारण श्वेता बच्चन ही कपूर परिवाराची सून आहे. अभिषेक व करिष्मा चा साखरपुडा तुटण्याचे अजून एक कारण सांगितले जात होते ते म्हणजे, लग्नानंतर करिश्माने अभिनय करणे सोडून द्यावे अशी जया बच्चनची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा बबीता व करिष्मा या दोघींनाही मान्य नव्हती. यामुळे या दोन्ही परिवारांना साखरपुडा तोडण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नव्हता. परंतु तरीही करिष्मा किंवा अभिषेक दोघांपैकी कोणीच त्यांच्या ब्रेक-अप बाबत उघडपणे सांगितले नाही.

जया बच्चनचा करिष्मा कपूर आधीपासूनच फारशी आवडायची नाही. मात्र अभिषेक व करिष्मा एकमेकांवर प्रेम करायचे त्यामुळे त्यांनी या लग्नाला मान्यता दिली. पण त्या या नात्या पासून कधीच खुश नव्हत्या. ही गोष्ट स्वतः जया बच्चन यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितली होती. मला अशी सून पाहिजे होते की तिला कौटुंबिक मूल्ये आणि संस्कृतीची चांगली जाणीव असावी.जितके मी करिश्माला ओळखते त्यावरून मला वाटते की तिला कौटुंबिक मूल्य व परंपरांची समज थोडी कमी आहे.

तिला अजिबातच समजत नाही असे मी म्हणत नाही मात्र ऐश्वर्याच्या तुलनेत नक्कीच तिला याबाबतीतील समज कमी आहे. करिष्मा चे वडील माझ्या पतीचे चांगले मित्र आहेत. करिष्मा कपूर मध्ये कपूर खानदानाचे रक्त आहे. जयाने पुढे सांगितले की तिला कौटुंबिक मूल्य व संस्कृती, परंपरा या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि याच कारणासाठी तिने अभिषेकला ऐश्वर्या सोबत लग्न करण्याची परवानगी दिली. आज अभिषेक व करिश्मा आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय आणि त्याच्या मुली सोबत खुश आहे. तर करिश्मा कपूर सुद्धा तिच्या मुलांसोबत आनंदाने जीवन जगत आहे. परंतु करिष्मा तिच्या पतीसोबत च्या घटस्फोटानंतर वेगळे आयुष्य जगते.

Leave a Comment