अंडरवर्ल्डने बुडवले या ५ अभिनेत्रींचे करियर, कोणाला झाली जेल तर कोण बनले संन्यासी !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डच्या संबंधाबद्दल नेहमीची चर्चा होत आली आहे. काही काळापूर्वी असे देखील म्हंटले जात होते कि अंडरवर्ल्डचा सर्व पैसा चित्रपटांमध्ये लावला जात असे. भारताचा मोस्ट वांडेट गुंड दाऊद इब्राहिमच्या पार्टीमध्ये नेहमी बॉलीवूड कलाकार आपल्याला पाहायला मिळत होते. काही अभिनेत्रींसुद्धा या अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमामध्ये पडल्या होत्या. आज अशाच काही अभिनेत्रींच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोनिका बेदी आणि अबू सालेम :- या यादीमध्ये सर्वात प्रथम नाव येते ते अभिनेत्री मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे. दाऊदचा उजवा हात समजले जाणाऱ्या अबू सालेमवर प्रेम करणे मोनिका बेदीला करियरच्या दृष्टीने खूप महागात पडले. मोनिकाने भलेही कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे परंतु ती तितकीच लोकप्रिय अभिनेत्री होती. मोनिकाच्या मते तिला माहित नव्हते कि अबू सालेम हा अंडरवर्ल्डचा सदस्य आहे. १८ सप्टेंबर २००२ मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी मोनिका बेदीला अटक करण्यात आली होती. यानंतरच दोघांच्या प्रेमाचा अंत झाला.मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम :- राम तेरी गंगा मैली चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीला १९९४-९५ मध्ये दुबई शारजाह येथे झालेल्या सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबरोबर पाहिले गेले होते. दोघांच्या फोटोमुळे आणि बातम्यांमुळे अनेक चर्चा झाल्या होत्या. परंतु मंदाकिनीने कधीच या बातमीला दुजोरा दिला नाही. मंदाकिनीची फिल्मी कारकीर्द १९९६ मध्ये आलेल्या चित्रपट जोरदार बरोबरच संपुष्टात आली. असे पण म्हंटले गेले होते कि दाऊदमुळेच मंदाकिनीला चित्रपटांमध्ये काम भेटले होते. परंतु बदनामी झाल्यामुळे तिला काम मिळणे मुश्कील झाले.ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी :- ममता कुलकर्णीची एके काळी लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना केली जात असे. मोठ-मोठे कलाकार तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. करियरच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या ममताच्या एका चुकीमुळे तीचे करियर धोक्यात आले. विक्की गोस्वामीसोबत तिचे नाव जोडले जाऊ लागले होते आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. २०१६ मध्ये ममता कुलकर्णीला केनिया एयरपोर्टवर पती विक्की गोस्वामीसोबत पोलिसांनी अटक केली. चौकशीनंतर ममताला सोडण्यात आले. असे म्हंटले जाते ममता आता संन्यासी बनून आपले आयुष्य व्यतीत करत आहे.सोना आणि हाजी मस्तान :- एकेकाळी अंडरवर्ल्डमध्ये हाजी मस्तानचाच बोलबाला होता. हाजी मस्तानने पहिल्यांदा आपल्या प्रोडक्शनमधील एका चित्रपटामध्ये सोनाला पाहिले होते आणि त्याच वेळी त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हाजी मस्तान लग्नाचा प्रस्ताव घेऊन सोना आणि तीच्या आईकडे गेला. सोनाने हाजी मस्तानच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकार केला आणि दोघांनी लग्न केले. परंतु डॉनच्या निधनानंतर सोनाला अनेक संकटांचा सामना करावा लागला.अनीता अयूब आणि दाऊद इब्राहिम :- ९० च्या दशकामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री अनीता अयूबशी दाऊद इब्राहिमची खूप जवळीक होती. दोघांच्या संबंधाची अफवा प्रचंड वेगाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरली होती. एका बातमीनुसार जेव्हा निर्माता जावेद सिद्दीकीने अनिताला त्याच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला त्यावेळी दाऊदच्या टोळीने त्याला ठार मारले होते. त्यावेळी दाऊदला फिल्म इंडस्ट्रीत खूप रस होता. तो अनेक चित्रपटामध्ये गुंतवणूक करत असे असेही म्हंटले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment