टीव्हीवरील बालअभिनेत्री अनुष्का सेनला आज पत्येक घरातील व्यक्ती ओळखतो. तिने हि ओळख निर्माण करण्यासाठी लहानपणापासूनच संघर्ष करायला सुरवात केली होती. तेव्हा कुठे ती या ठिकाणी पोहोचू शकली आहे. छोट्याशा वयामध्ये राज करणाऱ्या या अभिनेत्रीला खरी ओळख सोनी सबवरील बालवीर या सिरीयल मधून मिळाली. या शोमध्ये तिने मेहर नावाच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. तिचा जन्म झारखंडच्या राजधानीमध्ये झाला होता. सध्या ती मुंबईची मुळची रहिवासी आहे.

काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत घेतली गेली होती ज्यामध्ये तिला प्रश्न विचारला गेला कि तुझ्या आवडीचा हिरो कोण आहे? यावर अनुष्काने उत्तर दिले कि, फिल्म इंडस्ट्रीमधील नाही तर हॉलीवुड अभिनेता रॉबर्ट पॅटिनसनला पसंत करते. ती पुढे बोलताना म्हणाली कि तीला हॉलीवूड सुपरस्टार रॉबर्ट पॅटिनसनबरोबर डेटवर जायचे आहे. रॉबर्ट पॅटिनसन एक इंग्लिश अभिनेता, मॉडल आणि संगीतकार आहे. त्याने हॅरी पॉटर आणि आग का प्यालामध्ये सेडरिक डिगोरीची भूमिका साकारली होती ज्यामुळे तो जगप्रसिद्ध झाला.सध्या अनुष्काचा आवडता सुपरस्टार रॉबर्ट पॅटिनसनचे वय साधारण ३३ वर्षे इतके झाले आहे. अनुष्काचे वडील अनिर्बान सेनचे वय देखील रॉबर्टच्या वयाइतकेच आहे. अनुष्काच्या टीव्ही करियर बद्दल बोलायचे झाले तर तिने झांसी की रानी या सिरीयल मध्ये लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती ज्याला दर्शकांनी खूपच पसंती दिली होती.टीव्ही व्यतिरिक्त अनुष्का सोशल मीडियावर देखील खूप अॅेक्टिव असते. खासकरून इंस्टाग्रामवर ती नेहमी अपडेटेड असते. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर ती नेहमी आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे १४ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.