सुनेचे पोट पुढे आल्याने घरच्यांनी तिला समजले गर्भवती, पण तपसणी रिपोर्ट पाहून उडाले सर्वांचे होश !

By Viraltm Team

Updated on:

कोलकातामध्ये राहणाऱ्या एका महिलेचे पोट अचानक फुगू लागले. पोट फुगू लागल्याने महिलेच्या घरच्यांनी विचार केला कि ती गर्भवती आहे आणि तिसऱ्यांदा आई बनणार आहे. तथापि जेव्हा महिलेचे तपासणी रिपोर्ट आले तेव्हा प्रत्येकाचे होश उडाले.

असे सांगितले जात आहे कि नदिया जिल्ह्याच्या कालीगंज ठाण्याच्या अंतर्गत नसीपुरची राहणारी खोसनेहार बीवीचे पोट तीन महिन्या अगोदरच फुगू लागले. आधी यावर कोणी लक्ष दिले नाही पण जसे पोटाचा आकार वाढू लागला तेव्हा कुटुंबियांना वाटू लागले कि ती आई होणार आहे.

कुटुंबीयांनी खोसनेहार बीवीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यास सुरुवात केली. पण खोसनेहार बीवीची तब्येत दररोज खराब होऊ लागली आणि तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. काही दिवस तिच्या कुटुंबियांना वाटले कि कदाचित गर्भवती असल्यामुळे तिला उलट्या होत आहेत. पण तब्येत आणखीनच बिघडू लागल्याणे एक दिवस कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेले. जिथे तिची मेडिकल टेस्ट केली गेली.

मेडिकल टेस्ट केल्यानंतर जो रिपोर्ट समोर आला तो पाहून प्रत्येकजण हैराण झाला. रिपोर्टमध्ये आले कि खोसनेहार बीवीच्या पोटामध्ये बाळ नाही तर १० किलोचा ट्यूमर आहे. ज्यानंतर कटवा महकमा हॉस्पिटलमध्ये खोसनेहार बीवीला दाखल करण्यात आले आणि तिच्या पोटामधील ट्यूमर काढले गेले.

खोसनेहार बीवीची सासू नइमा बीवीनुसार तिच्या सुनेचे पोट गेल्या तीन महिन्यांपासून वाढत होते. तिला वाटले कि सून आई बनणार आहे. नइमा बीवीने सांगितले कि खोसनेहारला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मला वाटले कि ती पुन्हा आई बनणार आहे. मी माझ्या सुनेची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पण नंतर सुनेमध्ये असामान्य लक्षणे दिसू लागली. पाच दिवसांपूर्वी आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. सर्जनने स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवण्यास सांगितले. यानंतर आम्ही तिला कटवा महकमा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.

नइमा बीवीनुसार डॉक्टर प्रदीप करणने सुनेची मेडिकल टेस्ट केली. टेस्टचे रिपोर्ट आले. ते पाहून सर्वजण हैराण झाले. माझ्या सुनेच्या पोटामध्ये १० किलोचा ट्यूमर होता. त्यानंतर तिचे ऑपरेशन केले गेले. खोसनेहार प्रकृती आता सामान्य आहे आणि लवकरच तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात येईल.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment