बॉलीवूड म्हटलं की ग्लॅमर, चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, प्रेम प्रकरण, लग्न, घटस्फोट या गोष्टी तर आल्याचं. बॉलीवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांची दोन ते तीन लग्न झाली आहेत. तर मग घटस्फोट देणं तर आलंच. घटस्फोट देताना स्त्रीला पोटगी देण्याची पद्धत आहे. तर बॉलीवूडमधील आपण अशा 5 जोड्या पाहूया ज्यांचा घटस्फोटावेळी पोटगी देणं कलाकारांना महागात पडलं होतं.5) प्रभुदेवा और रामलता :- प्रभुदेवा हा टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि उत्कृष्ट डान्सर आहे. त्याचबरोबर ते कोरियोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. प्रभुदेवा यांनी तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 1985 मध्ये रामलता यांच्याशी लग्न केले परंतु लग्नामध्ये प्रॉब्लेम्स आल्याने 2011 साली त्यांचा घटस्फोट झाला आणि पोटगी म्हणून प्रभुदेवा यांनी त्यांचा पत्नीला 25 करोड इतकी रक्कम दिली.4) संजय दत्त और रिया पिल्लई :- नुकताच प्रदर्शित झालेला पानिपत चित्रपटात “अहमद शाह अब्दाली” हे पात्र गाजवणाऱ्या संजय दत्त यांना आपण ओळखतोच. संजय दत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माता आहेत. संजय दत्त यांनी 187 चित्रपटांमध्ये केले आहे. प्रणय कथांपासून (रोमान्सपासून) विनोदी शैलीपर्यंतच्या चित्रपटांमध्ये संजय दत्त यांनी काम केले आहे, परंतु सहसा अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये त्यांना अनेकदा आपण पाहिले आहे. संजू नावाचा चित्रपट देखील हल्लीच त्यांच्यावर प्रदर्शित झाला आहे. 1998 मध्ये रिया पिल्लई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. परंतु 7 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पोटगी म्हणून त्यांनी रिया पिल्लई यांना 8 करोड रुपये द्यावे लागले होते. आतापर्यंत संजय दत्त यांची 3 लग्न झाली आहेत.3) ह्रितिक रोशन और सुजैन खान :- बॉलीवूडमधील क्रिश असलेला उत्कृष्ट अभिनेता म्हणजे ह्रितिक रोशन. त्याने विविध पात्रे साकारली आहेत आणि आपल्या नृत्य कौशल्यांसाठी तो ओळखले जातो. भारतातील सर्वाधिक मानधन मिळालेल्या कलाकारांपैकी तो एक आहे. त्याने अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी ज्यात सहा फिल्मफेयर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी चार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) यासाठी प्रत्येकी एक पुरस्कार आहे. 2012 मध्ये तो आपल्या उत्पन्न आणि लोकप्रियतेच्या आधारे फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 मध्ये दिसला. ह्रितिकने 2000 साली आपल्या बालपणीचा मैत्रिणीशी म्हणजेच सुजैन खान सोबत लग्न केले. त्यांना 2 मुले आहेत. परंतु 13 वर्षांनंतर त्यांच्यामध्ये मतभेद झाल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे ह्रितिक आणि सुजैन चा घटस्फोट झाला आणि पोटगी म्हणून त्याने सुजैनला 400 करोड इतकी रक्कम दिली.2) करिष्मा कपूर और संजय कपूर :- बॉलीवूडमधील1990 1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीचा काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणारी हिंदी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करिष्मा कपूर विशेषत: स्त्री-केंद्रित चित्रपटांमध्ये काम केल्याबद्दल ओळखली जाते. करिष्मा कपूरला बहुतेक वेळेस देशातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक प्रशंसनीय पुरस्कार तिला मिळाले आहेत. 2003 साली उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत तिचा विवाह झाला. दोघांमध्ये मतभेद होऊन दुरावा निर्माण झाल्याने संजय कपूर यांनी करिष्मा कपूरला घटस्फोट दिला आणि पोटगी म्हणून 7 करोड रुपये इतकी रक्कम देऊ केली.1) सैफ अली खान और अमृता सिंह :- सैफ अली खान हा बॉलीवूडमधील अभिनेता तसेच चित्रपट निर्माता देखील आहे. “हम साथ साथ है”, “कल हो ना हो”, “दिल चाहता है” या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेल्या अमृता सिंह या अभिनेत्रीसोबत सैफने लग्न केले. परंतु यांचा विवाह अधिक काळ टिकला नाही. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला आणि पोटगी म्हणून सैफने 5 करोड रुपये इतकी रक्कम अमृता सिंहला देऊ केली. सैफ आणि अमृताला 2 मुलं आहेत.