कपिल शर्माचा जन्म २ एप्रिल १९८१ रोजी अमृतसरमध्ये झाला होता. त्याच्या सेंस ऑफ ह्यूमरचा पूर्ण देश दिवाना आहे. त्याच्या कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये भाग घेण्यासाठी लोक दूरवरून येतात. पण लोक तेव्हा निराश झाले जेव्हा कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्याचबरोबर हि सुद्धा माहिती समोर आली कि दोघेही आता पुन्हा कधी एकत्र पाहायला मिळणार नाहीत. भांडणानंतर हळू हळू कपिल शर्माची तब्येत खराब होऊ लागली ज्यामुळे त्याला सेलेब्सची शुटींग रद्द करावी लागली आणि चांगला चालत असलेला शो बंद करावा लागला. तथापि कपिलने पुन्हा आपला नवीन शो फैमिली टाइम विद कपिल शर्मा चालू केला. कपिल शर्माची फॅन फॉलोइंग इतकी मोठी आहे कि तो याच्या जोरावर कोणत्याही अभिनेत्याला टक्कर देऊ शकतो. पण या ठिकाणी पोहोचण्यासाठी कपिल शर्माचा प्रवास काही सोपा नव्हता.१) कपिलने छोट्या वयामध्ये पीसीओ मध्ये काम करून पैसे कमवायला सुरवात केली होती. १५ वर्षे कठोर मेहनत करून त्याला आज हे स्थान मिळाले आहे. त्यांनी पीसीओमध्ये काम केल्यानंतर कापड गिरणीमध्ये देखील काम केले होते.
२) कपिल शर्माचे वडील पंजाब पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल होते आणि २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. यानंतर घराची सर्व जबाबदारी कपिल शर्माकडे आली.
३) कपिल शर्माने अभिनय करियरची सुरवात थिएटर ग्रुपपासून केली होती, ज्याचा कुठेही कॉमेडीशी संबंध नव्हता. कपिल आपल्या थियेटर ग्रुप मधील मुलांना अभिनयाचे धडे देत असे. पण जेव्हा त्याला पैशांची तंगी होऊ लागली त्यावेळी त्याने थियेटर ग्रुप सोडून वेगळा मार्ग निवडला.
४) कपिल शर्माने आतापर्यंत एकूण ९ रियालिटी शो जिंकले आहेत. सर्वात पहिला कपिलने कॉमेडी शो हसदे हसांदे रहो मधून सुरवात केली, ज्यानंतर त्याला ग्रेट इन्डियन लाफ्टर चॅलेंजमध्ये संधी मिळाली. इथे जिंकल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कॉमेडीने एक स्थान निर्माण केले. हा त्या ९ शोमधील एक शो होता जो कपिल शर्माने २००७ मध्ये जिंकला होता.५) कपिल शर्मा एक असा अभिनेता आहे ज्याने कोणतीही फिल्मी पाश्वर्भूमी नसताना आणि कॉमेडीच्या दुनियेमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. त्याचे वडील आणि भाऊ दोघेही पोलीस फोर्समध्ये होते, त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबाच्या मदतीने नाही तर आपल्या स्वतःच्या जोरावर बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे.
६) बॉलीवूडमध्ये असे काही लोक आहे ज्यांच्या नावाने त्यांचा शो ओळखला जातो. कपिल शर्मा त्यापैकीच एक आहे.
७) कपिलला नेहमीच संगीताच्या दुनियेमध्ये आपले नशीब आजमावयाचे होते पण त्याच्या नशिबाने त्याला कॉमेडीकडे वळायला भाग पाडले.८) कॉमेडी किंग कपिलने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे कि त्याला वयोवृद्ध व्यक्तींच्यासाठी एक एक ओल्ड एज होम म्हणजेच वृद्धाश्रम बनवायचे आहे.
९) चंदन कपिलचा लहानपणापासूनचा मित्र आहे. कपिलच्या शोमध्ये चंदन चंदू चायवालाची भूमिका साकारतो.
१०) काही महिन्यांपूर्वी कपिल शर्मा पिता बनला आहे. बुधवारी लॉकडाउनमुळे सर्व लोकांनी अष्टमी साजरी केली. या निमित्ताने कपिलने आपल्या लाडक्या मुलीसोबत पूजा केली.
खूपच कठीण होता कपिल शर्माचा कॉमेडीयन बनण्याचा प्रवास, पोट भरण्यासाठी केले होते PCO मध्ये काम !
By Viraltm Team
Published on: