अमिताभ बच्चन ते तापसी पनू पर्यंत असा साजरा केला या सेलिब्रिटींनी प्रजासत्ताक दिन !

By Viraltm Team

Published on:

७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिथे संपूर्ण भारतभर उत्सव साजरा होता आहे तिथे बॉलीवूडमध्ये तितक्याच जोशाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याशिवाय एका बाजूला संपूर्ण देशामध्ये उत्सवाचे वातावरण आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तिथे सोशल मिडियावर पण प्रजासत्ताक दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. याशिवाय फिल्मी कलाकार देखील जनतेला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन, अनुपम खेर, तापसी पनू सारख्या दिग्गज कलाकारांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वात पहिला सुरवात करूयात महानायक अमिताभ बच्चन पासून. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव असतात, याचबरोबर ते खास प्रसंगी नेहमी देशवासीयांना आणि आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत असतात. अशाच प्रकारे अमिताभ बच्चन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून स्वतःचाच एक फोटो शेयर केला आहे. या फोटोसोबत अमिताभ यानी लिहिले आहे कि. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद. आपली प्रत्येक गोष्ट लोकांच्या समोर ठेवणारे अभिनेता अनुपम खेर यांनीहि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी एक कॅप्शनहि दिले आहे, माझ्या प्रिय भारतवासियांनो, आपल्या सर्वाना मनापासून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. कोट्यावधी भारतीयांनी मिळून हा महान देश निर्माण केला आहे. आम्ही याला विखरु देणार नाही. याचबरोबर भारत माता की जय. जय हिंद. अभिनेत्री तापसी पनूने देखील देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तापसी ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे ज्यात तिने लिहिले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा माझ्या देशवासियांनो. चला आज थोडा वेळ काढून संविधानाची काही पाने वाचूया. जय हिंद.याशिवाय देश आणि जगाशी संबंधीत सामाजिक मुद्द्यांवर आपले मत परखडपणे मांडणारे अभिनेता परेश रावलनेसुद्धा देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परेश रावल ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लिहिले की, जगातील सर्व माझ्या भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वंदे मातरम्. अभिनेता जावेद जाफरी यांनीहि या खास प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. जावेदने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे कि, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसके ये गुलिस्ता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम वतन है हिंदुस्तान हमारा. याशिवाय जगातील सर्वात श्रेष्ठ संविधानाच्या सूत्रधारांना सलाम. आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद !!! यामध्ये काजल अग्रवालनेहि जनतेला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. काजलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेयर केला आहे आणि या फोटोसोबत एक कॅप्शनहि दिले आहे, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.

Leave a Comment