किती आहे “तान्हाजी” चित्रपटाचे बजट? सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर होण्यासाठी कमवावे लागतील इतके करोड !

By Viraltm Team

Published on:

१० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या अजय देवगनच्या तान्हाजी:द अनसंग वारियर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्व दर्शक आतुरतेने वाट पाहत होते. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरने चांगलीच खळबळ उडवून दिली होती आणि प्रेक्षकहि या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. अजय देवगनचा हा चित्रपट अनेक प्रकारे खास आहे. अजयसोबत काजोल, सैफ आली खान आणि शरद केळकर यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपटातील मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेची भूमिका अजय देवगनने अतिशय उत्कृष्ठरित्या साकारली आहे.

जेव्हा कधीही इतिहासावर आधारित एखादा चित्रपट बनवला जातो त्यावेळी त्याचे बजटहि खूप जास्त असते. तानाजी या चित्रपटाचे बजट १३५ कोटी इतके आहे. यामध्ये १५ करोड रुपये प्रोडक्शन आणि प्रमोशनमध्ये खर्च झाले आहेत. याप्रकारे या चित्रपटाचे एकूण बजट १५० करोड इतके आहे. अजय देवगनने पहिल्यांदा एखाद्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केले आहे आणि चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला समजते कि त्याने या चित्रपटातील त्याची भूमिका किती उत्कृष्ठ प्रकारे साकारली आहे.चित्रपटाच्या बजटनुसर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरण्यासाठी किमान १५० करोडच्या वर कमाई करावी लागेल. आणि जर या चित्रपटाला सुपरहिट चित्रपटाच्या श्रेणीमध्ये बसायचे असेल तर २०० कोटींची कमाई करावी लागेल. त्याचबरोबर जर हा चित्रपट २३० कोटींच्या वर कमाई करण्यास यशस्वी झाला तर तो ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ठ होईल. आणि या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून हा चित्रपट नक्कीच २३० कोटींच्या वरती कमाई करेल.

या चित्रपटाने आतापर्यंत ७३ कोटी इतकी कमाई केलेली असून याची घौडदौड अजून सुरूच आहे. या चित्रपटाला भारतामध्ये ३८८० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले आहे. उत्कृष्ठ कथा आणि जबरदस्त ऍक्शन भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे आणि हेच कारण आहे कि हा चित्रपट भारताशिवाय इतर देशांमध्ये चांगली कमाई करत आहे.

Leave a Comment