मृत्यूच्या काही तासाअगोदर दिव्या भारतीने खरेदी केले होते घर, मृत्यूच्या रात्री झाली होती हि घटना !

By Viraltm Team

Updated on:

दिव्या भारतीने खूप छोट्या वयामध्ये यश आणि लोकप्रियता मिळवली होती. आजही काही लोक अशी आहेत जी अजूनही सांगतात कि दिव्या भारती बॉलीवूडमध्ये सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. दिव्या भारतीने जी लोकप्रियता मिळवली ती इतर अभिनेत्रींना मिळवणे खूप अवघड आहे. दिव्या भारतीने खूपच लहान वयामध्ये या जगाचा निरोप घेतला. दिव्या भारतीचा मृत्यू सर्वात मोठे रहस्य बनून राहिले आहे.

अवघ्या १४ व्या वर्षी केली होती करियरची सुरवात :- दिव्या भारतीने आपल्या करियरची सुरवात अवघ्या १४ व्या वर्षी केली होती. तिने फक्त एका वर्षामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. दिव्या भारतीने आपल्या छोट्याशा करियर मध्ये १२ चित्रपटांमध्ये काम केले. दिव्या खूपच लहान वयामध्ये अतिशय सुंदर दिसत होती आणि खूपच प्रसिद्ध झाली होती. तिने दीवाना, बलवान, दिल आशना है, दिल ही तो है सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.अशाप्रकारे झाली होती साजिदसोबत भेट :- दिव्या जेव्हा अवघ्या १६ वर्षांची होती त्यावेळी तिची भेट साजिद नाडियाडवाला सोबत झाली होती. या दोघांची भेट फिल्म सिटीमध्ये चित्रपट शोला और शबनमच्या शुटींगदरम्यान झाली होती. जब साजिद गोविंदाला भेटण्यासाठी गेला त्यावेळी गोविंदाने साजिद आणि दिव्या यांची भेट घडवून दिली.

यानंतर साजिदने १५ जानेवारी १९९२ रोजी दिव्या भारतीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांचे लग्न २० मे १९९२ रोजी झाले होते आणि तिने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव सना नाडियाडवाला असे ठेवले होते.
मृत्युच्या काही तासांपूर्वीच विकत घेतले होते घर :- दिव्या भारतीने आपल्या मृत्युच्या काही तासांपूर्वीच मुंबईमध्ये एक ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. हि बातमी तिने आपला भाऊ कुणालला पण दिली होती. त्याच दिवशी दिव्या भारती शुटींग करून चेन्नईला आली.

तिच्या पायाला दुखापत झाली होती. दिव्या भारती रात्री १०.०० वाजता मुंबईच्या पश्चिम अंधेरी, वर्सोवा स्थित अपार्टमेंटमधील आपल्या घरी निता लुल्ला आणि तिच्या पतीसोबत होती. तिघेही खूप मस्ती करत होती. परंतु काही मिनिटांनंतर दिव्या भारती अचानक तिच्या खोलीच्या खिडकीतून खाली पडली. दिव्या भारतीच्या खोलीतील खिडकीला ग्रील लावली गेली नव्हती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment