९० च्या दशकातील प्रसिद्ध अॅक्ट्रेस रितू शिवपूरी २५ जानेवारी रोजी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यावेळी या अॅक्ट्रेसने आंखे या चित्रपटातील लाल दुपट्टे वाली गाण्यातून खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्याकाळी हे गाणे इतके फेमस झाले होते कि, लहान मुलांपासून ते वृद्धांच्या ओठावर रेंगाळत असे. इतकेच नाही तर आजसुद्धा जेव्हा ह्या गाण्याचा उल्लेख केला जातो तेव्हा रितु शिवपुरीची आठवण जरूर येते. सध्या रितू फिल्मी दुनियेपासून दूर कसे आयुष्य जगत आहे चला जाणून घेऊयात.
१९९३ मध्ये आलेला गोविंदाचा चित्रपट आंखे मधून या अॅक्ट्रेसने खूप प्रसिद्धी मिळविली होती. चित्रपटाचे गाणे लाल दुपट्टे वाली खूपच फेमस झाले होते. अॅक्ट्रेस रीतुने आपल्या फिल्मी करियर मध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीला आंखें, हम सब चोर हैं, आर या पार, भाई भाई, हद कर दी आपने, लज्जा, शक्ति: द पावर आणि ऐलान सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.२००६ मध्ये रितू शिवपुरी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. याचवर्षी एक पंजाबी चित्रपट एक जिंद एक जान मध्ये तिला शेवटचे पाहिले गेले होते, या चित्रपटामधील तिच्या भूमिकेला लोकांनी खूपच पसंती दिली. ११ वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतल्यानंतर रितूने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. २०१७ मध्ये इस प्यार को क्या नाम दूं या सिरीयलमध्ये अभिनय करताना दिसली होती. या सिरीयल मध्ये रितूने शिवानी तोमरच्या आईची भूमिका साकारली होती जिला लोकांनी भरभरून प्रेम दिले.रीतुने एका मुलाखतीदरम्यान आपल्या अॅक्टिंगच्या दुनियेमधील पुनरागमनाबद्दल सांगितले कि, २००६ ला जेव्हा पंजाबी चित्रपटासाठी १८ ते २० तास काम करून घरी परतत होते तेव्हा माझे पती मला झोपलेलेच दिसायचे. मी या गोष्टीवरून खूप अस्वस्थ व्हायचे कि करियरच्या चक्करमध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकत नव्हते, मी खूपच लकी आहे माझे पती खूपच साधे आणि सरळ आहेत आणि त्यांनी कधीच माझ्या कामाबद्दल तक्रार केली नाही, पण हे काम माझ्यावर इतके हावी झाले कि मी अॅक्टिंग सोडून काही वर्षे कुटुंबासमवेत घालवण्याचा निर्णय घेतला.सध्या अॅक्ट्रेस रितू शिवपूरी फिल्मी दुनियेपासून दूर आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असते. सोशल मिडियावरील या अॅक्ट्रेसचे हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलचे फोटो पाहून तिचे चाहते तिच्याकडे आकर्षिले जातात.