बॉलीवूडचा जेव्हा कधी उल्लेख होतो तेव्हा कलाकारांची एक अशी इमेज समोर येते जे चित्रपटांमध्ये काम करतात, ग्लॅमरस दाखवतात. पण बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखल्या जातात आणि सामाजिक मुद्यांवर उघडपणे मत व्यक्त करतात.
बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक उच्च स्थान प्राप्त केले होते. पण दीपिका सामाजिक मुद्यांवर सुद्धा आपले मत उघडपणे व्यक्त करते. तिने लोकांची विचारसरणी बदलण्याचेही काम केले आहे.
बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतबद्दल जितके सांगावे तितके कमीच आहे. कंगना रनौतने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिज्मच्या मुद्यावर आवाज उठविला. तिने करण जोहरला समोरासमोर नेपोटिज्मचा फ्लैग बियरर म्हंटले होते. कंगना देशाच्या मुद्यांवरसुद्धा उघडपणे आपले मत व्यक्त करते. ती कोणासमोरहि घाबरत नाही.तनुश्री दत्ताबद्दल तर तुम्हाला चांगलेच माहिती असेल जिने बॉलीवूडमध्ये मीटू मूवमेंटची सुरवात केली होती. तिने नाना पाटेकरवर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप लावला होता, ज्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या शोषणाचा खुलासा केला.
पायल रोहतगीने सोशल मिडियाद्वारे देशातील अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. पण एका चुकीच्या विधानामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता ज्यामुळे तिला जेलमध्ये सुद्धा जावे लागले होते.
स्वरा भास्करने देशातील बहुतेक मुद्यांवर आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे. तिने जेएनयू हिंसा आणि सीएएवर सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे तिला ट्रोलसुद्धा व्हावे लागले होते.