पहिला चित्रपट सुपरहिट होऊन देखील मिळाले नाही या ८ अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये काम !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली पण पुढे जाऊन हे कलाकार आपली ओळख नाही बनवू शकले आणि बॉलीवूडमधून गायब झाले. तर काही अभिनेत्री आज चित्रपटामध्ये कामासाठी तळमळत आहेत. या अभिनेत्रींनी मोठ-मोठ्या स्टार्ससोबत काम केले परंतु तरीही सफलता त्यांच्या हातामध्ये आली नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच अ‍ॅक्ट्रेसेस बद्दल सांगणार आहोत ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर गायब झाल्या.

सोनल चौहान :- जन्नत गर्ल सोनल चौहान तर तुम्हाला माहितीच असेल. जिने बॉलीवूडचा सिरीयल किसर इमरान हाशमीसोबत जन्नत चित्रपटामधून एन्ट्री केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला ज्यानंतर वाटले कि सोनल बॉलीवूडमध्ये खूपच प्रसिद्धी मिळवेल पण असे काहीच झाले नाही. त्यानंतर महानायक अमिताभ बच्चनसोबत सोनलचा बुड्डा होगा तेरा बाप हा चित्रपट आला होता. परंतु दर्शकांना हा चित्रपट पसंत पडला नाही. ज्यानंतर सोनल हळूहळू फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली.शमिता शेट्टी :- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीनेसुद्धा मोहब्बते या चित्रपटामधून आपली फिल्मी कारकीर्द सुरु केली होती. त्याचबरोबर काही चित्रपटामध्ये २-३ चांगले आइटम नंबरसुद्धा केले. परंतु शमिता आपल्या बहिणीप्रमाणे सफल होऊ शकली नाही.ईशा गुप्ता :- अभिनेत्री ईशा गुप्ताने इमरान हाशमीसोबत जन्नत २ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. तिला पहिल्याच चित्रपटामधून खूप प्रसंशा मिळाली. तिने २००७ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. याशिवाय ईशाला मिस फोटोजेनिकचा अ‍ॅवॉर्ड देखील मिळाला आहे. पहिल्या चित्रपटानंतर ईशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले परंतु तिचा कोणताही चित्रपट हिट होऊ शकला नाही. आता ईशा चित्रपटामध्ये खूपच कमी पाहायला मिळते.आयशा टाकिया :- बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबत वॉन्टेड या चित्रपटामध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री आयशा टाकियाने टारजन द वंडर कार या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती. हा चित्रपट मात्र हिट झाला नाही पण आयशाला अनेक चित्रपटांमध्ये पाहिले गेले. त्यानंतर सलमान खानच्या वॉन्टेड या चित्रपटामधून ती पुन्हा चर्चेमध्ये आली. परंतु वॉन्टेड सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर तिने लग्न करून फिल्मी इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला.स्नेहा उलाल :- बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची डुप्लीकेट म्हणून प्रसिद्ध असणारी स्नेहा उलालने सुपरस्टार सलमान खानच्या लकी या चित्रपटामधुन बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवले. परंतु तिला बॉलीवूडमध्ये जास्त प्रसिद्धी नाही मिळाली. त्यानंतर सलमान खांनचा भाऊ सोहेल खानने तिला आपला चित्रपट आर्यन मध्ये मुख्य रोल दिला. परंतु हा चित्रपट हिट झाला नाही. त्यानंतर स्नेहाची तब्येत बिघडली आणि तिने चित्रपटांमधून काढता पाय घेतला.
ग्रेसी सिंह :- अभिनेत्री ग्रेसी सिंहला लगान या चित्रपटामध्ये आमिर खानसोबत सर्वात प्रथम पाहिले गेले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि ग्रेसीचा अभिनय देखील लोकांना खूप पसंत आला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले परंतु ती जास्त काही कमाल दाखवू शकली नाही. सध्या ग्रेसी बॉलीवूडपासून दूर आहे आणि आता ती टीव्ही सिरीयलमध्ये काम करते.किम शर्मा :- २००२ मध्ये मोहब्बते या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेणारी अभिनेत्री किम शर्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. तिला बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेपासून दूर जाऊन ११ वर्षे झाली आहे. मोहब्बते चित्रपटानंतर किमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले परंतु तिला जास्त सफलता मिळाली नाही. हळू हळू किमला काम मिळणे बंद झाले आणि ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. शेवटचे तिला २००९ मध्ये मघधीरा या चित्रपटामध्ये पाहिले गेले होते आणि या चित्रपटामध्ये तिचा कैमियो रोल होता.प्रीति झंगियानी :- प्रीति झंगियानीने आपले करियर मोहब्बते या चित्रपटामधून सुरु केले होते. चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रत्येकाने पसंत केले. परंतु या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये काम करून देखील तिच्या करियरला गती मिळाली नाही. त्यानंतर २००८ मध्ये प्रितीने अ‍ॅक्टर आणि मॉडल परवीन डबाससोबत लग्न केले.

Leave a Comment