प्लास्टिक सर्जरीमुळे कुरूप झाल्या होत्या या अभिनेत्री, या अभिनेत्रीला तर चक्क ७ वेळा चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते !

By Viraltm Team

Published on:

बहुतेकदा प्लास्टिक सर्जरी हि तेव्हाच केली जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुर्घटनेमध्ये खूप खराब होतो. परंतु आजच्या काळामध्ये ज्या लोकांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते प्लास्टिक सर्जरीचा उपयोग आपला चेहरा अधिक सुंदर करण्यासाठी करतात. अशा अनेक बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्यांनी आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. आज जर आपण पाहिले तर बॉलीवूडमध्ये प्रत्येक अ‍ॅक्ट्रेसने कोणतीना कोणती सर्जरी केलीच आहे. सर्जरी केल्याने अर्थातच सौंदर्य वाढतेच परंतु अनेक वेळा ती खराब देखील होते ज्याचा परिणाम खूपच वाईट दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अ‍ॅक्ट्रेसेसबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून आपला चेहरा खराब करून घेतला होता.

आयशा टाकिया :- आयशा टाकियाने टीव्हीवरील जाहिरातीमधून आपल्या करियरची सुरवात केली होती. २००५ मध्ये तिने सोचा ना था या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने आपल्या चेहऱ्याची सर्जरी करून घेतली जी चुकीची सिद्ध झाली यामुळे चेहरा खराब झाला होता, यानंतर तिला पुन्हा अनेक सर्जरीमधून जावे लागले होते.श्री देवी :- श्री देवीने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत, तिच्या करियरची सुरवात साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून झाली होती. ती बॉलीवूडच्या टॉपच्या अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक होती. २००२ मध्ये श्रीदेवीने आपल्या नाकाची सर्जरी केली होती जी तोट्याचा सौदा सिद्ध झाली. त्यानंतर तिने पुन्हा सर्जरी करून व्यवस्थित करून घेतले. आज ती आपल्यामध्ये नाही परंतु बॉलीवूडमध्ये तिचे योगदान अतुलनीय आहे.कोएना मित्रा :- कोएना मित्राला २००३ मध्ये ब्यूटी अवार्डसुद्धा मिळाला आहे, तिने काही चित्रपटांमध्ये काम देखील केले होते परंतु सफलता मिळवण्याच्या नादात तिने अधिक सुंदर दिसण्यासाठी आपली प्लास्टिक सर्जरी करून घेतली, यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बदलला आणि त्याचबरोबर तिचे करियर देखील बुडाले.प्रियांका चोप्रा :- प्रियांका चोप्राने देशाचे नाव खूप उज्वल केले आहे, ती आज बॉलीवूडशिवाय हॉलीवुडमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. प्रियांका ने २००० मध्ये मिस वर्ल्डचा अवार्ड जिंकला होता. असे म्हंटले जाते कि त्यादरम्यान तिने नाकाची सर्जरी करून घेतली होती, ज्यामुळे तिला खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. बातमीनुसार तिच्या नाकामुळे तिला तब्बल ७ चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले होते.

Leave a Comment