तरुणपणी नशेमुळे या अभिनेत्रीने संपवले होते आपले करियर, ४४ व्या वर्षी मिळाले ३ चित्रपट !

By Viraltm Team

Published on:

२००० मध्ये सुपरस्टार हृतिक रोशनबरोबर कहो ना प्यार है या चित्रपटामधून डेब्यू करणारी अभिनेत्री अमिषा पटेलने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. ज्याच्या जोरावर अमिषाने आपली एक खास ओळख फिल्मी जगतामध्ये बनवली होती. पण काही चुकांमुळे तिने आपले स्वतःचे करियर खराब केले. आणि आज ती बराच काळ चित्रपटापासून दूर आहे.

अभिनेत्री अमिषा पटेलने आपल्या करियरच्या दरम्यान ग़दर एक प्रेम कथा, आप मुझे अच्छे लगने लगे, हमराज सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले. असे असूनहि आज अमिषा फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात फ्लॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. तिचे करियर बरबाद होण्यामागे अनेक कारणे आहेत. आपल्या परिवारासोबत भांडण आणि वडिलांवर संपत्ती हडप करण्याचा आरोप देखील तिने लावला आहे.एक काळ असा होता कि जेव्हा अमिषा पटेलला नशेचे व्यसन लागले होते. ती दारू आणि सिगारेटच्या अधीन झाली होती. या व्यतिरिक्त आपल्या तरुणपणामध्ये विक्रम भट्ट आणि कणव पूरीसोबत तिचे अफेयर देखील खूप चर्चेमध्ये राहिले होते. ती आपल्या करियरवर फोकस करू शकली नाही आणि हळू हळू फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिला चित्रपट मिळणे बंद झाले. सध्या अमिषा पटेलचे वय ४४ वर्षे इतके झाले आहे आणि ती अजूनही अविवाहित आहे.अभिनेत्री अमिषा पटेलचा शेवटचा चित्रपट रेस २ होता जो जवळ जवळ ७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१८ मध्ये तिला सनी देओलच्या सोबत भैया जी सुपरहिट मध्ये पाहिले गेले होते. हे वर्ष तिच्यासाठी खपच लकी ठरले होते कारण काही दिवसांपूर्वीच तिला एकदाच तीन चित्रपटांची ऑफर मिळाली आहे. अमिषा पटेलच्या आगामी चित्रपटाचे नाव देसी मॅजिक आहे जो एक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट असेल. याशिवाय ती आजकाल तोबा तेरा जलवाचे शुटींग करत आहे. त्याचबरोबर द ग्रेट इंडियन कॅसिनो हा आणखीन एक चित्रपट तिच्या हातामध्ये आहे.

Leave a Comment