बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलीवूडमध्ये खूप नाव कमावले आहे. यामधील काही कलाकार आजही बॉलीवूडमध्ये काम करत आहेत आणि आपल्या मुलांनादेखील बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी मदत करत आहेत. परंतु या कलाकारांमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना आपल्या मुलीने चित्रपटांमध्ये काम करने पसंत नाही आणि त्यांनी आपल्या मुलींना बॉलीवूडमध्ये कधीही काम करू दिले नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील काही अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या मुलींना बॉलीवूडमध्ये कधीही काम करू दिले नाही.

राज कपूर :- बॉलीवूड इंडस्ट्रीमधील महान अभिनेता राज कपूरला आपल्या मुलीने चित्रपटांमध्ये काम करणे कधीही पसंत नव्हते. यामुळे त्यांनी आपल्या मुली ऋतु नंदा आणि रीमा कपूर यांना बॉलिवूडमध्ये कधीही काम करू दिलं नाही.ऋषि कपूर :- बॉलीवूड चित्रपट अभिनेता ऋषि कपूर चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. ऋषि कपूरचा मुलगा रणबीर कपूर तर बॉलीवूडमधी सुपरस्टार आहेच परंतु रिद्धिमा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीपासून नेहमीच दूर राहते.संजय दत्त :- बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मापासून त्याला एक मुलगी आहे जिचे नाव आहे त्रिशाला. संजयला आपली मुलगी त्रिशालाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ द्यायचे नाही. त्याने एका मुलाखतीदरम्यान हे देखील बोलले होते कि जर त्रिशालाने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले तर तो तिचे पाय तोडेल.नीना गुप्ता :- काही काळापूर्वी बधाई हो चित्रपटामध्ये पाहायला मिळालेली नीना गुप्ताची सुद्धा इच्छा नाही कि तिची मुलगी मसाबा गुप्ताने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करावे. मसाबा एक फॅशन डिझायनर आहे.अमिताभ बच्चन :- बॉलीवूड चित्रपटसृष्टीमधील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन आज सुद्धा बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवून आहेत आणि जोमाने काम करत आहेत. पण अमिताभजी सुद्धा आपली मुलगी श्वेता हिने चित्रपटामध्ये काम करण्याच्या विरुद्ध आहेत. यामुळे श्वेता फिल्मी दुनियेपासून दूरच राहते.