या आहेत बॉलीवूडमधील तीन-तीन सख्या भावांच्या ७ जोडया, पहिली आहे सुपरहिट आणि दुसरी, तिसरी आहे फ्लॉप !

By Viraltm Team

Published on:

आज बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांच्या जवळच्या नात्यातले आहेत. अशामध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील तीन-तीन सख्या भावांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ज्यामधील कोणी सुपरहिट झाले तर कोणी चित्रपटांमध्ये फ्लॉप झाले. काही भावांच्या जोड्यांबद्दल कोणालाही माहित नाही तर काही भावांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.

१) किशोर कुमार, अनूप कुमार आणि अशोक कुमार :- या तीन भावांच्या जोडीपैकी दोन भाऊ हे अभिनेता आहेत तर एक भाऊ मोठा गायक होता ज्याला आपण आजही ओळखतो. हे तिघे भाऊ किशोर कुमार, अनूप कुमार आणि अशोक कुमार चित्रपट चलती का नाम गाडी या चित्रपटामध्ये एकत्र स्क्रीन शेयर करताना पाहिले गेले होते.२) शम्मी कपूर, राज कपूर आणि शोमैन राज :- हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासामध्ये या भावांना म्हणजेच शम्मी कपूर, राज कपूर आणि शोमैन राज यांना आजही आठवले जाते. ज्यामधील दोघांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली तर तिसऱ्याने निर्माता आणि गायक बनून जगामध्ये नाव कमावले. आजही या तिन्ही भावांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात.३) ऋषि कपूर, राजीव कपूर आणि रणधीर कपूर :- कपूर घराण्याची मुले रणधीर कपूर, राजीव कपूर आणि ऋषि कपूर हे तिघे भाऊ आजही बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर पाय रोऊन आहेत. ज्यामधी ऋषि कपूरचा मुलगा फिल्मी दुनियेमधील सुपरस्टार बनला आहे. आज लाखो लोक यांच्यासाठी वेडे आहेत.४) अमरीश पुरी, चमन पुरी आणि मदन पुरी :- अमरीश पुरीने आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयांवर राज्य केले. तर त्यांचा दुसरा भाऊ चमनने अनेक चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तर तिसरा भाऊ मदनने अनेक वर्षे चित्रपटांमध्ये एक चांगला कलाकार म्हणून काम करून आपले नाव कमावले.५) अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर :- चित्रपट निर्माता म्हणून श्रीदेवीचे पती बोनी कपूर आजही बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. तर त्यांचे दोन्ही भाऊ संजय आणि अनिलने अनेक हिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन केले आहे. ज्यामधील अनिल अजूनही बॉलीवूडमध्ये आपला दबदबा कायम राखून आहे, तर संजय कपूर ने आज बॉलीवूडमधून काढता पाय घेतला आहे.६) सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान :- सलमानबद्दल आज सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाला त्यांच्या स्टाईल आणि अभिनयाची आवड आहे. तर त्याचा मोठा भाऊ अरबाज खान चित्रपटांमध्ये सफल होऊ शकला नाही, तर त्याने चित्रपट निर्माता म्हणून प्रसिद्धी मिळवली, तिसरा भाऊ सोहेलबद्दल बोलायचे झाले तर तो आता चित्रपटांपासून दूर आहे.७) देवानंद, चेतन आनंद आणि विजय आनंद :- देवानंदला तर आपण सर्वजन चांगलेच ओळखतो, तो पूर्वीच्या काळातील एक सदाबहार अभिनेता होता. तर त्यांचा मोठा भाऊ चेतन एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते आणि तिसरा भाऊ विजय चित्रपटामध्ये काही खास कमाल दाखवू शकले नाहीत.

Leave a Comment