बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ठ कलाकार आहेत ज्यांनी पूर्ण जगामध्ये खूपच लोकप्रियता मिळवली आहे. एका काळामध्ये शशी कपूर देखील बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राहिले आहेत. त्यांचा एक डायलॉग मेरे पास मां है आज सुद्धा लोकांच्या चांगलाच आठवणीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आठवला जाईल.
शशी कपूर यांची लोकप्रियता इतकी होती कि जेव्हा त्याचे निधन झाले त्यावेळी पूर्ण जगामध्ये शोककळा पसरली होती. त्यांचे या जगातून जाणे बॉलीवूडसाठी खूप मोठा धक्का मानला जातो. परंतु जगाचा नियमच आहे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे.शशी कपूर कपूर घराण्याचे एकमेव असे सदस्य आहेत ज्यांनी परदेशी मुलीशी लग्न केले. शशी कपूरने जेनिफर केंडलसोबत लग्न केले होते. जेनिफर आणि शशी कपूर यांची तीन मुले कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूर आहेत. शशी कपूरने केवळ वयाच्या ३ ऱ्या वर्षी अभिनय करने सुरु केले होते. ९० च्या दशकातील अंतिम वर्षांमध्ये त्यांनी बॉलीवूडपासून स्वत:ला दूर केले.
आज आम्ही तुम्हाला शशी कपूरच्या नाती बद्दल सांगणार आहोत जी खूपच सुंदर दिसते आणि शशी कपूरच्या नातीच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्री सुद्धा फिक्या पडतात. शशी कपूरच्या नातीचे नाव आलिया कपूर आहे.
आलिया कपूर मुलगा करण कपूरची मुलगी आहे. आलिया कपूर आपले वडील करण कपूर सारखेच बॉलीवूड पासून दूर राहणे पसंत करते. आलिया कपूर खूपच जास्त सुंदर आहे. आलिया सुंदरतेच्या बाबतीत जान्हवी कपूर, सारा अली खान आणि सुहाना यांनासुद्धा टक्कर देते.भलेही आलिया फिल्मी दुनियेपासून दूर आहे परंतु कदाचित येत्या काळामध्ये ती आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळू शकते कारण त्यांचे घराणे हे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. आलिया सध्या लंडनमध्ये आपल्या परिवारासोबत राहते. करण कपूरने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले. आलिया कपूरचे सोशल मिडियावर फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.