पतीपेक्षा जास्त कमाई करते हि अभिनेत्री, तरीही जगते साधे आयुष्य नाही करत कमाईवर घमंड !

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा आज टीव्ही जगतातील एक नामांकित चेहरा बनली आहे. तिच्या करियरची सुरवात भोजपुरी चित्रपटामधून झाली होती. तिचा स्टारडम पाहून तिला बिग बॉस या शोकडून ऑफर मिळाली. बिग बॉससारख्या शोमध्ये स्पर्धक झाल्यानंतर मोनालिसाचे नशीब पालटले. तिला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम मिळायला सुरवात झाली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.

टीव्ही सिरीयल नजर मधून तीला प्रत्येक घरा-घरात ओळख मिळाली. नजरच्या प्रत्येक एपिसोडमध्ये काम करण्यासाठी मोनालिसा ५०००० रुपये इतके मानधन घेते. भोजपुरी चित्रपटामध्ये अ‍ॅक्टिंग करने तिने सोडलेले नाही. एका चित्रपटासाठी ती ५ ते ७ लाख रुपये इतके मानधन घेते. तिची एकूण संपत्ती ८ करोड इतकी आहे. तिच्याजवळ महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे आणि काही दिवसांपूर्वीच तिने एक नवीन ऑडी ब्रँडची कार खरेदी केली आहे.मोनालिसाच्या पतीचे नाव विक्रांत सिंह राजपूत असे आहे. विक्रांत सिंह राजपूर एक नवीन कलाकार आहे आणि निश्चितच त्याची कमाई मोनालिसापेक्षा कमी आहे. पतीपेक्षा जास्त कमाई असूनदेखील मोनालिसा सरळ आणि सभ्य आहे. श्रीमंत असूनदेखील तिला साधेपणाने राहणे आवडते. मोनालिसा तिच्या पतीसोबत नेहमी टाइम स्पेंड करताना दिसत असते.
मोनालिसाने विक्रांत सिंह राजपूतसोबत २०१७ मध्ये लग्न केले होते. विक्रांत सिंह राजपूतसोबत लग्न करण्याअगोदर मोनालीसाचे पहिले लग्न झाले होते परंतु काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला. विक्रांतसोबत मोनालिसा एक खुशहाल जीवन जगत आहे. मोनालिसा सोशल मिडियावरसुद्धा खूप अ‍ॅक्टिव असते आणि नेहमी पतीसमवेत आपले फोटो शेयर करत असते.

Leave a Comment