संगीतसृष्टी हा’द र’ली ! प्रसिद्ध गायिकेचे नि ध’न, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वा’स…

By Viraltm Team

Published on:

बंगाली आणि उडियामध्ये आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध असलेली प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्राने या जगामधून एक्झिट घेतली आहे. त्या ८१ वर्षाच्या होत्या. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक आजारांनी त्यांना घेरले होते. दक्षिण कोलकाता येथील चेतला भागामध्ये त्या राहत होत्या.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले कि रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. नर्सिंग होममध्ये जेव्हा त्यांना आणले गेले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. गायिकाचे पार्थिव रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवले गेले. रवींद्र सदनमध्ये लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे अंतिम संस्कार कोरताला स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.

गायिका निर्मला मिश्रा यांचा वैद्यकीय उपचारांवर विश्वास नव्हता. तिने नेहमीच वैद्यकीय उपचार टाळण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी सांगितले कि ती घरगुती इलाजांवर जास्त भर द्यायची. आपल्या शेवटच्या क्षणी देखील ती घरीच होती. याआधी देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले गेले होते. पण त्या हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हत्या यामुळे घरीच त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. डॉक्टरांनुसार याआधी देखील त्यांना तीनवेळा स्ट्रोक आणि दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला होता.

बोले तो अर्शी, कागोजेर फूल बोले, ई बांग्लार माटी चाय सारख्या लोकप्रिय गाण्यांना त्यांनी आपला मधुर आवाज दिला आहे. त्यांना उत्कृष्ट गायिकासाठी बालकृष्ण दास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. निर्मला मिश्रा यांनी अनेक उडिया गाणी देखील गायली आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Comment