बजरंगी भाईजानच्या मुन्नीने सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टाकले मागे, पहा ग्लॅमरस फोटो…

By Viraltm Team

Published on:

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजान तर तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. हा चित्रपट २०१५ मध्ये आला होता. या चित्रपटामध्ये एक लहान मुलगी आपल्याला पाहायला मिळाली होती. जिने मुन्नीची भूमिका साकारली होती. जिला कदाचित लोक विसरून देखील गेले असतील. चित्रपटामध्ये मुन्नीचा निरागसपणा आणि हात वर करून बोलण्याचा अंदाज सर्वांनाच आवडल होता.

बजरंगी भाईजानमध्ये सलमान खाननंतर जर कोणाची चर्चा जास्त झाली असेल तर ती म्हणजे मुन्नी. चित्रपटामध्ये मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या या बालअभिनेत्रीचे नाव हर्षाली मल्होत्रा आहे जिने या भूमिकामुळे खूपच लोकप्रियता मिळवली होती. चित्रपटामध्ये तिच्या क्यूटनेसचे सर्वजण फॅन झाले होते.

भलेहि ती चित्रपटामध्ये मुन्नीच्या भूमिकेमध्ये काही बोलू शकली नाही पण न बोलताच तिने आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले होते. आता मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा हि १४ वर्षाची झाली आहे. हर्षाली मल्होत्राने नुकतेच तिचा १४ वा वाढदिवस साजरा केला आहे.

मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राने फिल्मी जगतामध्ये बजरंगी भाईजान चित्रपटामधून पदार्पण केले होते. सध्या हर्षाली मल्होत्राला कोणत्याही ओळखीची गरज नाही. बजरंगी भाईजान मध्ये तिच्या लहान मुलीची भूमिका सर्वांनाचा आवडली होती.

जवळ जवळ सात वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटामध्ये हर्षाली मल्होत्राने लहान मुलगी मुन्नीची भूमिका साकारली होती. पण आता ती खूपच मोठी झाली आहे. १४ वर्षीय हर्षाली मल्होत्रा सोशल मिडियावर देखील चांगलीच सक्रीय आहे आणि चाहत्यांसोबत ती आपले फोटो शेयर करत राहते. हर्षाली मल्होत्राचे प्रत्येक फोटो हे सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

हर्षाली मल्होत्राने सोशल मिडियावर नुकतेच आपले काही फोटो शेयर केले आहेत. जे चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर लोक असा अंदाज लावत आहेत कि मुन्नी इतकी मोठी झाली आहे. हर्षाली मल्होत्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून गेल्या काही दिवसांपूर्वी आपले फोटो शेयर केले होते.

हर्षाली मल्होत्राने सोशल मिडियावर जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि तिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूड अभिनेत्री देखील फिक्क्या पडतात. इतर फोटोंमध्ये तर इतकी जास्त सुंदर दिसत आहे कि बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि करीना कपूर देखील तिच्यासमोर फिक्क्या पडतील.


हर्षाली मल्होत्राला इंस्टाग्रामवर जवळ जवळ १६ लाख पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. तर हर्षाली मल्होत्रा स्वतः २०७ लोकांना फॉलो करते. हर्षाली मल्होत्रा ज्यावेळी बजरंगी भाईजान चित्रपटाची शुटींग करत होती तेव्हा तिचे वय अवघे ७ वर्षे होते पण आता सलमान खानची मुन्नी खूपच स्टाईलिश झाली आहे.


बजरंगी भाईजान चित्रपटापूर्वी हर्षाली मल्होत्राने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे. या सिरियल्समध्ये कबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया सरख्या सिरियल्स सामील आहेत. बजरंगी भाईजान चित्रपटासाठी हर्षालीचे खूपच कौतुक झाले होते. यासोबत बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट अवार्ड देखील तिला मिळाला होता.


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment