सुशांत सिंह राजपूत केस मध्ये दिवसेन दिवस नवीन खुलासे होत आहेत. सुशांत सिंह केस प्रकरणात रिया चक्रवर्ती संदर्भात असाच एक आश्चर्यचकित करणारा खुलासा झाला आहे. रिया चक्रवर्ती च्या कॉल डिटेल्स नुसार बॉलिवूडमधील खूप अभिनेत्यांना रियाने बातचीत केली. रिया चक्रवर्तीने रकुल प्रीत सिंह, आदित्य रॉय कपूर, राणा दग्गुबाती, सनी सिंह, सरोज खान, अमीर खान, श्रद्धा कपूर, अशा अनेक अभिनेता व अभिनेत्री यांना कॉल्स केले होते.याव्यतिरिक्त रियाने AU हा संदिग्ध व रहस्यमयी ह्या नावाने मोबाईल मध्ये सेव केला होता. चौकशीमध्ये या नंबरला संदिग्ध याच्यामुळे म्हटलं जात आहे. कारण रियाने टाईम्स नाऊ च्या रिपोर्टनुसार जेव्हापासून AU ह्या नावाने सेवा असलेला नंबर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तेव्हापासून रिया ची फॅमिली रिया ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. AU हा रहस्यमय नंबर सोशल मीडियामध्ये खूपच जलद गतीने व्हायरल झाला. त्यामुळे रिया चक्रवर्ती ने त्या संदर्भात मोठा खुलासा केला आहे.रिया सांगते की AU सोशल मीडिया वरती वायरल होणारा नंबर तिची खास मैत्रीण अनन्या उदास हिचा आहे. रियाची अनन्या उदासी खास मैत्रीण असल्याकारणाने या दोघींमध्ये संभाषण होत होतं. सुशांत सिंह राजपूत केसची ह्या नंबरचा काही देणे घेणे नाही. परंतु 63 वेळा अनन्या उदास ला कशामुळे रियाने कॉल केला होता हे आणखीन चौकशीत समोर आलेलं नाही. परंतु सोशल मीडियामध्ये ह्या नंबर संदर्भात जोरदार चर्चा होत आहे.सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी 28 जुलै रोजी बिहारयेथील पटना येथे रिया चक्रवर्ती सह कुटुंबातील इतर सहा सदस्यावर त्यांच्या मुलाला आ*त्म*ह*त्ये*साठी प्रवृत्त केल्याबद्दल केस दाखल केली आहे. रियाच्या फॅमिलीतील सर्व सदस्यावर पटना पोलिसांनी कलम 341, 342, 380, 406, 420, अनुसार गुन्हा दाखल केला आहे. सुशांत सिंह च्या परिवारातले रियावर आरोप केला आहे की स्वतःचे करिअर सांभाळण्यासाठी सुशांत सिंह राजपूत सोबत मैत्री केली होती.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.