तान्हाजीमधील हा मुलगा आहे दिग्गज कलाकार, केले आहे अनेक चित्रपटांमध्ये काम !

By Viraltm Team

Published on:

१० जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट तान्हाजी-द अनसंग वॉरियर सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडीत काढत २०० कोटींच्या वर गल्ला जमवलेला आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय देखील तितकाच उत्कृष्ठ झाला. त्याचबरोबर तान्हाजी मालुसरे यांचा मुलगा रायबाची भूमिका देखील त्या बालकलाकाराने अतिशय उत्कृष्ठरित्या साकारली आहे. परंतु रायबाची हि भूमिका साकारणारा बालकलाकार कोण आहे माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

तान्हाजी चित्रपटामध्ये रायबाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव अरुष नंद असे आहे. अरुष हा अवघ्या ९ वर्षांचा असून त्याने दीडशेहून अधिक जाहिराती, 8 बॉलिवूड चित्रपट, २ हॉलिवूड चित्रपट आणि एका मराठी चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्याने अनेक सिरियल्समध्ये देखील काम केले आहे.

अरुषने सुपरहिट चित्रपट द लायन किंग या चित्रपटामधील छोट्या सिंबाच्या व्यक्तिरेखेसाठी आपला आवाज देखील दिला आहे. याशिवाय नेटफ्लिक्स ओरिजिनल, ‘राइझिंग डायन’ साठी त्याने डबिंगही केले आहे. आरुषने आपल्या अभिनय कौशल्याने आणि कर्तृत्वाने प्रत्येकाला प्रभावित केले आहे आणि भविष्यातील त्याची उद्दीष्टे देखील खूप मोठी आहे. अरुषने अभिनयाचे धडे गुंडेचा एज्युकेशन एकॅडमी मुंबई येथून घेतले आहेत.
अरुषच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नीरजा या चित्रपटामधून त्याने अभिनय कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यानंतर त्याने फोबिया, डियर जिंदगी, ट्यूबलाइट आणि परमानू: द स्टोरी ऑफ पोखरण सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या द वॉरियर क्वीन ऑफ झांसी या चित्रपटामुळे त्याला विशेष ओळख मिळाली. तर १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या तान्हाजी-द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये त्याने रायबाची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment